ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात कृषी साहित्याची मोठी उलाढाल

ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात कृषी साहित्याची मोठी उलाढाल
ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात कृषी साहित्याची मोठी उलाढाल

औरंगाबाद : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने येथे आयोजित कृषी प्रदर्शनात सहभागी देश-विदेशांतील नामवंत ॲग्रो ब्रँडच्या स्टॉलधारकांना यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल खरेदीसह कृषी यंत्रे आणि छोट्या-मोठ्या अवजारांच्या खरेदीची उलाढाल चार दिवसांत लाखोंच्या घरात पोचली.  औरंगाबाद शहरातील जबिंदा मैदानावर चार दिवस (२७ ते ३० डिसेंबर) ॲग्रोवन कृषी प्रदर्शन नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. पहिल्या दिवसापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, व्यावसायिक, ग्राहकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील देश-विदेशांतील नामवंत ॲग्रो ब्रँडच्या विविध उत्पादनांना येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनार्थींकडून बुकिंग व प्रत्यक्ष शेतीमाल खरेदी   करण्याची संधी या निमित्ताने साधली गेली. यांत्रिकीकरणातील अद्ययावत अशा बॅक हो लोडर, ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, पॅावरटिलर यांसारख्या विविध यंत्रांची खरेदी आणि नोंदणी या ठिकाणी झाली.  ‘बॅक हो लोडर’च्या चार यंत्राची नोंदणी प्रदर्शनात झाली. या एका यंत्राची किंमत २५ लाखांहून अधिक आहे. तसेच ड्रिप साहित्य, पीव्हीसी पाइप आणि इतर सिंचनाच्या साधनांची ३० ते ३५ लाख रुपयांची विक्री झाली. सबसॉयलर  शुगरकॅन प्लांटर, पेरणी यंत्र नांगर आदी यंत्रांची विक्री झाली. त्याशिवाय ट्रॅक्टरचलित आणि बैलचलित कुळव, सारायंत्रांची बुकिंग वितरकाला मिळाली. वर्मी बेड, एचडी एचडीपी पाइप, शेततळ्यांचे अस्तरीकरण, कडबा कुट्टी यंत्रे, मिल्किंग मशिन, पावर विंडर, ब्रश कटर आदी कृषी साहित्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.  थेट विक्री दालनात ५० लाखांची उलाढाल  शेतकरी ते थेट ग्राहक असे स्वतंत्र दालन या ठिकाणी उभारण्यात आले होते. त्यात शेतकरी गट आणि महिला बचत गटांच्या २२ स्टॅालचा समावेश होता. सर्व प्रकारच्या डाळी, हळद, सेंद्रिय गूळ, जवस, तीळ, मिरची, मिरची पावडर, उन्हाळी पदार्थ, लाकडी घाण्यावरील तेल, विविध प्रकारचे तांदूळ आदींचा समावेश होता. त्यातही सेंद्रिय पद्धतीच्या धान्याला सर्वाधिक मागणी राहिली. सुमारे ५० लाखांहून अधिक उलाढाल केवळ शेतकरी ते ग्राहक या दालनातून झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com