Agriculture news in marathi Over one and a half lakh farmers in Amravati Benefit of interest concession | Agrowon

अमरावतीत दीड लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार व्याज सवलतीचा फायदा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

तीन लाखांपर्यंतचे कर्ज आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेचा जिल्ह्यातील १.४७ लाख नियमित कर्जदारांना फायदा होणार आहे.

अमरावती : तीन लाखांपर्यंतचे कर्ज आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या घोषणेचा जिल्ह्यातील १.४७ लाख नियमित कर्जदारांना फायदा होणार आहे. त्याकरिता ३० जूनपर्यंत त्यांना कर्जाची परतफेड करावी लागेल. 

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात नियमित कर्जदारांना व्याज सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तीन लाखांपर्यंतचे कर्ज डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी पात्र ठरणार आहे. ३ डिसेंबर २०१२चे शासन आदेशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एक लाखांपर्यंतचे कर्ज मुदतीत परतफेड केल्यास ३ टक्‍के व्याज सवलत मिळते. १ ते ३ लाखांपर्यंतचे कर्ज मुदतीत म्हणजे ३० जूनपर्यंत भरणा केल्यास एक टक्‍क्‍यांपर्यंत व्याजात सवलत मिळते.

विशेष म्हणजे या योजनेत सर्वच बॅंका कव्हर करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी नाबार्डकडून जिल्हा बॅंकेला व तेथून गावागावांतील विकास सोसायटी मार्फत खातेदारांना कर्जपुरवठा करण्यात येतो. यात एक लाखांपर्यंतचे कर्ज शून्य दराने शेतकऱ्यांना मिळते. मात्र जिल्हा बॅंकेला हे सहा टक्‍क्‍यांपर्यंत पडते. यात प्रत्येकी केंद्र व राज्य शासन तीन टक्‍के व्याज देते.

एक ते तीन लाखांच्या व्याजासाठी देखील राज्य शासन तीन व केंद्र शासन दोन टक्‍के रक्‍कम देते. आता ही सवलत तीन लाखांपर्यंतच्या नियमित कर्जधारकास मिळणार आहे. मात्र, यातील निकष शासन आदेश निघाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत. आता अधिवेशन संपल्याने शासन परिपत्रक लवकरच निघेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सुमारे १.४७ लाख नियमित कर्जदारांना यांचा फायदा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

व्याज सवलत योजनेवर दृष्टीक्षेप

  • नियमित कर्जदार    १.४७,४६० 
  • बॅंकांद्वारे कर्जवाटप    १३२९.१४ कोटी 
  • राष्ट्रीयकृत बॅंकांचे खातेदार    ९४.१८३ 
  • ग्रामीण बॅंकांचे खातेदार    १,५२९ 
  • जिल्हा बॅंकांचे खातेदार    ५१,७४८

इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...