agriculture news in Marathi over one lac crore require for complete loan waive Maharashtra | Agrowon

संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी' रक्कम...

तात्या लांडगे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राज्यातील बळिराजाला संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची गरज आहे. त्यातून सुमारे एक कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल. मात्र, श्रीमंत व बड्या राजकीय पुढाकाऱ्यांना कर्जमुक्‍ती कशाला पाहिजे?
- सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री

सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत बळिराजाची खडतर वाटचाल सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील एक कोटी १३ लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपये लागणार असून एवढी मोठी रक्‍कम उभी करायची कशी, यादृष्टीने केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

फडणवीस सरकारने जुलै २०१७ मध्ये राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली, तर दीड लाखाहून अधिक कर्जदारांना उर्वरित रक्‍कम भरल्यावरच कर्जमाफीचा लाभ मिळेल, असेही स्पष्ट केले. दुसरीकडे मागच्या वर्षीचा दुष्काळ, हमीभावाची प्रतीक्षा, एकरकमी एफआरपी मिळेना आणि या वर्षीचा पूर व अतिवृष्टीमुळे बॅंकांचे कर्ज फेडणे शेतकऱ्यांना मुश्‍कील झाले.

दरम्यान, मागील पाच वर्षांतील नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आत्महत्याही वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता संपूर्ण कर्जमाफीसाठी हालचाली सुरू असून, केंद्र सरकारशी चर्चाही सुरू आहे. मात्र, राज्यातील बळिराजाचा सातबारा कोरा करण्यासाठी अटी अन्‌ निकष काय असतील, यावरही चर्चा सुरू असल्याचे वित्त विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्यासाठी एक लाख कोटींची गरज असल्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ओटीएसची मुदत ऑक्‍टोबरला संपली
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्‍कम बॅंकांमध्ये भरणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली आणि आतापर्यंत या योजनेला सहावेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ ला ओटीएसची मुदतवाढ संपली आणि त्यानंतर मुदतवाढ दिलीच नाही, त्यामुळे दीड लाखावरील थकबाकीदारांची पंचाईत झाली आहे.

राज्याची सद्यःस्थिती

  • जून २०१९ पर्यंत थकबाकीदार : ५६.९२ लाख
  • जिल्हा बॅंकांची शेतीची थकबाकी : ४९,६०० कोटी
  • संपूर्ण कर्जमाफीतील शेतकरी : १.१३ कोटी
  • कर्जमुक्‍तीसाठी लागणारी रक्‍कम : १.०३ लाख कोटी

इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...