agriculture news in Marathi over one lac hector affected in Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३ गावांमध्ये शेतीपिकाचे जुलै अखेरपर्यंत नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अंदाजात समोर आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३ गावांमध्ये शेतीपिकाचे जुलै अखेरपर्यंत नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अंदाजात समोर आली आहे. जवळपास १ लाख ५८ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या १ लाख १५ हजार ६६२ हेक्‍टर ७१ गुंठ्यांवरील शेतीपीक बाधित झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सर्वंच जिल्ह्यांतील शेतीपिकाचे जून, जुलैमध्ये आलेल्या अतिपावसाने व पुरामुळे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गावांमध्ये जालन्यामधील ७९, परभणी २४२, हिंगोली ७८, नांदेड ५६३, बीड १५, लातूर १४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांचा समावेश आहे. जालन्यातील १४ हजार ८१०, परभणीतील ४६ हजार २५०, हिंगोलीतील ४२९४, नांदेडमधील ९२ हजार ३५३, लातूरमधील ७०४, तर उस्मानाबादमधील ४३४ शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्रात १ लाख १३ हजार ९४९ हेक्‍टर १ गुंठ्यावरील जिरायती, १५९६ हेक्‍टर ६० गुंठ्यांवरील बागायती, तर ११७ हेक्‍टर १० गुंठ्यांवरील फळपिकांचा समावेश आहे. 

सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात तर त्यापाठोपाठ परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा नुकसानीत क्रमांक लागतो. प्राथमिक नुकसानीनुसार बाधित क्षेत्रासाठी जिरायती ६८०० रुपये, बागायती १३५०० रुपये, तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्यात येते. शासनाच्या निकषाचा व झालेल्या नुकसानीचा विचार करता जिल्हानिहाय एकूण अपेक्षित निधीत जालना जिल्ह्यात ५ कोटी १६ लाख, परभणी २३ कोटी ५७ लाख, नांदेड ४८ कोटी १४ लाख बीड ८९ लाख, लातूर ३१ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १२ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीची गरज लक्षात घेता ७८ कोटी २२ लाखांवर निधीची गरज असेल, असे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात नमूद करण्यात आल्याचे प्रशासनाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

जिल्हानिहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 

  • जालना...६८४६.५० 
  • परभणी... ३३९२७ 
  • हिंगोली... २१६१.३० 
  • नांदेड... ७०८०६.७० 
  • बीड... १२७४ 
  • लातूर... ४६१ 
  • उस्मानाबाद...१८६.२१  

 
 


इतर अॅग्रो विशेष
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...