agriculture news in marathi, over sixty eight thousand farmers facing crop damage, sindhudurga, maharashtra | Agrowon

`क्यार` चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील ६८ हजार शेतकऱ्यांना फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सिंधुदुर्ग  ः ‘क्यार’ चक्रीवादळाने जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, या चक्रीवादळामुळे ६८ हजार १४७ शेतकऱ्यांचे ३० हजार १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अंतिम नुकसानीचा आकडा कमी झाला असून, १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग  ः ‘क्यार’ चक्रीवादळाने जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, या चक्रीवादळामुळे ६८ हजार १४७ शेतकऱ्यांचे ३० हजार १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अंतिम नुकसानीचा आकडा कमी झाला असून, १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात ‘क्यार’ चक्रीवादळामुळे झालेली अतिवृष्टी आणि लांबलेला पाऊस यामुळे जिल्ह्यातील परिपक्व स्थितीतील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. कृषी विभागाने सुरुवातीला जिल्ह्यातील २९ हजार ६८७ हेक्टर भातशेतीचे १३८ कोटींचे नुकसानीचा अदांज व्यक्त केला होता. कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक गेले दहा ते बारा दिवस संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे करीत होते. पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम आकडेवारीनुसार भातशेतीच्या नुकसान क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नुकसानीच्या क्षेत्रात ३२८ हेक्टरने वाढ झाली आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्येत ६०४९ हेक्टरने वाढ झाली आहे.

यापूर्वी कृषी विभागाने जिल्ह्यात भातशेतीचे २० कोटींचे नुकसान अपेक्षित धरले होते. मात्र पंचनामे करताना नुकसान अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी कृषी विभागाने भातशेतीचे नुकसान १३८ कोटींपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अंतिम नुकसानीचा आकडा हा १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपयांपर्यंत आला आहे. सर्वाधिक भातशेतीचे नुकसान कुडाळ तालुक्यात झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.

असे आहे नुकसान 
कुडाळ - ५५ कोटी ३ लाख, सावंतवाडी-२४ कोटी ७५ हजार, मालवण-२० कोटी ३ लाख ७६ हजार, कणकवली-१२ कोटी ९ लाख, वैभववाडी-७ कोटी ६ लाख, वेंगुर्ले-३कोटी २२ लाख ६१ हजार, देवगड-२ कोटी ४४ लाख १६ हजार, दोडामार्ग- ५ कोटी ४८ लाख १६ हजार रुपये.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...