राज्‍यातील २८८ मतदारसंघांतून ३२३९ उमेदवार रिंगणात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी) लढतींचे सर्व चित्र स्‍पष्‍ट झाले. राज्‍यातील २८८ मतदारसंघांतून ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिपळूण मतदारसंघात सर्वांत कमी ३, तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्‍हणजे ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

उमेदवारी अर्ज घेण्याची सोमवारी (ता. ७) शेवटची मुदत होती. विविध मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्‍याने ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. अकोले, शहादा, बोरिवली, माहिम, वांद्रे पश्‍चिम या मतदारसंघात प्रत्‍येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातून ९१ उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र अर्ज मागे घेतल्‍यानंतर आता तिथे फक्‍त ७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ उमेदवार संख्येपर्यंत १ बॅलट युनिट, ३५ उमेदवार असतील तिथे २ बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत. त्‍यापेक्षा जास्‍त उमेदवार असतील तिथे ३ बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, मतदारयादीत ४० लाख बोगस मतदार असल्‍याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्‍यावर मतदारयाद्यांचे सातत्‍याने पुनर्निरीक्षण केले जात आहे. पुनर्निरीक्षणावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येतो. ३१ ऑगस्‍टपासून ते आतापर्यंत २ लाख मतदारच वाढले असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्यात आले. नागपूर पश्‍चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख अशी लढत आहे. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक अर्ज प्रतिज्ञापत्रासंदर्भात निर्माण झालेल्‍या वादावरून स्‍थानिक निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार तपासून लवकरच निर्णय देण्यात येणार असल्‍याची माहिती अतिरिक्‍त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारू, १५ कोटी २९ लाख रुपयांचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौल्यवान दागिने असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात विविध कलमांखाली ४४२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com