agriculture news in marathi, over three thousand candidates fight election, mumbai, maharashtra | Agrowon

राज्‍यातील २८८ मतदारसंघांतून ३२३९ उमेदवार रिंगणात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मुंबई  : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी) लढतींचे सर्व चित्र स्‍पष्‍ट झाले. राज्‍यातील २८८ मतदारसंघांतून ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिपळूण मतदारसंघात सर्वांत कमी ३, तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्‍हणजे ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

मुंबई  : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी) लढतींचे सर्व चित्र स्‍पष्‍ट झाले. राज्‍यातील २८८ मतदारसंघांतून ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिपळूण मतदारसंघात सर्वांत कमी ३, तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक म्‍हणजे ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

उमेदवारी अर्ज घेण्याची सोमवारी (ता. ७) शेवटची मुदत होती. विविध मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्‍याने ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. अकोले, शहादा, बोरिवली, माहिम, वांद्रे पश्‍चिम या मतदारसंघात प्रत्‍येकी चार उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघातून ९१ उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र अर्ज मागे घेतल्‍यानंतर आता तिथे फक्‍त ७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ उमेदवार संख्येपर्यंत १ बॅलट युनिट, ३५ उमेदवार असतील तिथे २ बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत. त्‍यापेक्षा जास्‍त उमेदवार असतील तिथे ३ बॅलट युनिट लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, मतदारयादीत ४० लाख बोगस मतदार असल्‍याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्‍यावर मतदारयाद्यांचे सातत्‍याने पुनर्निरीक्षण केले जात आहे. पुनर्निरीक्षणावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येतो. ३१ ऑगस्‍टपासून ते आतापर्यंत २ लाख मतदारच वाढले असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्यात आले.
नागपूर पश्‍चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख अशी लढत आहे. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक अर्ज प्रतिज्ञापत्रासंदर्भात निर्माण झालेल्‍या वादावरून स्‍थानिक निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार तपासून लवकरच निर्णय देण्यात येणार असल्‍याची माहिती अतिरिक्‍त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारू, १५ कोटी २९ लाख रुपयांचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौल्यवान दागिने असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात विविध कलमांखाली ४४२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...