agriculture news marathi, over three thousand hector area damage due to heavy rain, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे ३१७६ हेक्टरवरील पिके, फळपिके तसेच शेतजमिनीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९१३४ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे ३१७६ हेक्टरवरील पिके, फळपिके तसेच शेतजमिनीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९१३४ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना जिल्ह्यातील शेतजमिनी आणि पिकांच्या नुकसानीबाबतच्या प्राथमिक अहवालाची माहिती नुकतीच सादर केली. त्यामधून ही बाब स्पष्ट झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित हा अहवाल तयार केला आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे एकूण दोन लाख ९३ हजार २९१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी बारामती, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातील सुमारे १५४ गावांमधील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. 
पुरंदर तालुक्यातील वज्रगड, किल्ले पुरंदर आणि परिसरात २५ सप्टेंबरला रात्री ढगफुटी झाली. त्यामुळे परिसरातील सासवड, नारायणपूर, नारायणपेठ, भिवडी, चिव्हेवाडी, सुपे खुर्द अशा सुमारे वीसहून अधिक गावांमधील शेतजमिनी, उभी पिके, घरे, जनावरांचे गोठे, जनावरे, वाहने, छोटे पूल यांचे नुकसान झाले. अनेक विहिरी गाळाने भरल्या तर अनेक विहिरी खचल्या. रस्त्याचेही मोठे नुकसान झाले. ढगफुटीमुळे पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.

बारामतीमध्येही पुराच्या पाण्यामुळे मोरगाव, तरडोली, जळगाव सुपे, जळगाव कॅंप, बाभुर्डी, कऱ्हाटी, अंजनगाव, बऱ्हाणपूर, मेडद, नेपतवळण, कऱ्हा वागज, बारामती ग्रामीण, मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, लोणी भापकर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 
स्थानिक कृषी विभाग, महसूल विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. यामध्ये पिकांचे नुकसान क्षेत्र, घरे, जनावरे, वाहने, पुरामुळे वाहून गेल्या व्यक्ती यांचा समावेश होता. ही माहिती घेऊन ती तत्काळ जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली. सध्या नुकसान झालेल्या गावांमध्ये पंचनामे सुरू असून लवकरच नुकसानीबाबतची नेमकी माहिती पंचनाम्यातून स्पष्ट होईल.
 

प्राथमिक अहवालानुसार तालुकानिहाय बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या
तालुका क्षेत्र  शेतकरी संख्या
हवेली  ३२९ १३०८
भोर १५७ ६०२
वेल्हा १५  २२१
पुरंदर २३०१ ५६६२
बारामती ३७४ १३४१

 

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...