बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी कर्जमुक्त

बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले पीक कर्जमुक्तीतून १४४० कोटी रुपयांची रक्कम मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत.
Over two and a half lakh farmers in Beed district are debt free
Over two and a half lakh farmers in Beed district are debt free

बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले पीक कर्जमुक्तीतून १४४० कोटी रुपयांची रक्कम मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत. कर्जमुक्ती साठी आतापर्यंत दोन लाख ६५ हजारांवर शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. दोन लाख ५२ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम आली आहे.

कर्जमुक्तीची सर्वाधिक रक्कम (५८२ कोटी रुपये) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीत पडली. पीक कर्जमुक्तीमुळे जिल्हा बँकेचीही दैना फिटली आहे. या बँकेलाही तब्बल ३६१ कोटी रुपये मुक्तीच्या माध्यमातून मिळाले आहेत. अद्यापही ५० हजारांवर शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत  आहेत.

दोन लाख रुपये थकीत पीक कर्जाला मुक्ती दिली. दरम्यान, यात जिल्ह्यात तीन लाख तीन हजारांवर शेतकरी पात्र ठरले. आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ८२१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. यातील दोन लाख ६० हजार ६९३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ३९६ शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाच्या खात्यावर १४३९ कोटी ५१ लाख रुपये जमा झाले आहेत. 

...तरीही कर्जवाटपात हात आखडताच

दरम्यान, अद्याप ५० हजारांवर शेतकरी पीक कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. पात्र ठरलेल्या यादीतील पाच हजारांवर शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरणही झाले नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेलाही ३३५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रला ५५ कोटी ६४ लाख रुपये मिळाले. पीक कर्जमुक्तीद्वारे तिजोऱ्यांत पैशाची रेलचेल झालेली असतानाही बँकांकडून पीक कर्जासाठी हात आखडलेलाच असल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीचे ५८६ कोटी अधिक

मागच्या महायुती सरकारनेही शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली. मात्र, या योजनेच्या अटीच जाचक आहेत. त्याचा लाभ मर्यादित राहिला. या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांचा लाभ झाला. आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमुक्तीतून आतापर्यंत १४३९ कोटी रुपयांचा लाभ झाला. मागच्या पेक्षा आतापर्यंत ५८६ कोटी रुपयांची रक्कम अधिक मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com