Agriculture news in Marathi Over two and a half thousand agricultural vendors from Varada participated in the bandh | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी १० ते १२ जुलै या काळात बंद पुकारण्यात आला असून वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी विक्रेते यात सहभागी होणार आहेत. बंदच्या काळात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी १० ते १२ जुलै या काळात बंद पुकारण्यात आला असून वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी विक्रेते यात सहभागी होणार आहेत. बंदच्या काळात प्रशासनाकडून अद्याप कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

सोयाबीन बियाणे न उगवल्याप्रकरणी विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू नये, अशी प्रमुख मागणी केली आहे. याशिवाय इतर मुद्यांबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु, याबाबत अद्याप न्याय न मिळाल्याने अखेरीस शुक्रवार (ता. १०) पासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.

या बंदमध्ये अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांतील सुमारे अडीच हजारांवर कृषी विक्रेते सहभागी होणार आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे तयारी झाली आहेत. सध्या हंगामात सोयाबीन, मका पिकांवर कीडनाशक फवारणीची लगबग सुरू आहे. सोबतच काही ठिकाणी पेरणीनंतरची खत देण्याचीही कामे होत आहे. शिवाय आधी सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्यासुद्धा होत आहेत.

एकाच वेळी शेतीतील विविध कामे सुरू आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची वेळ अत्यंत कमी केलेली आहे. यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता तीन दिवसांचा हा बंद शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी या तीन दिवसांत कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

संप सरकारने तात्काळ मिटवावा ः तुपकर
निकृष्ट बियाणे प्रकरणामध्ये कृषिसेवा विक्रेत्यांना वगळण्यात यावे. या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील कृषिसेवा केंद्र धारकांनी १० जुलै पासून संप पुकारला आहे. या संपामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने कृषी सेवा केंद्र संचालकांच्या संपाबाबत हस्तक्षेप करून हा संप तात्काळ मिटवावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी (ता. नऊ) केली आहे.  

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...