पावसामुळे पुणे जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकऱ्यांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या पंचनाम्याच्या अहवालातून सुमारे दोन लाख ६० हजार ८९३ शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख २६ हजार ३४४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यासाठी सुमारे १३८ कोटी ७३ लाख ४७ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामात पीक काढणीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४५४ गावांतील सुमारे एक लाख ५८ हजार ९६९ शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले होते. त्यानंतर या गावांत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांनी तातडीने पंचनामे सुरू केले होते. आता पंचनामे पूर्ण झाले असून, त्याची एकत्रित माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून शासनाला पाठविण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख ६ हजार ६८३ हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील सुमारे १८४ गावांतील ५६ हजार ५१३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सुमारे २७ हजार ५२३ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. आंबेगावमधील १४१ गावांतील ३२ हजार ७७४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. उर्वरित शिरूर, खेड, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांतही पंचनामे पूर्ण झाले आहेत.  

तालुकानिहाय झालेले पीक पंचनाम्याचे क्षेत्र (हेक्टर) शेतकरी संख्या
तालुका शेतकरी संख्या क्षेत्र
भोर ५४८४ १३६४.७८
वेल्हा    ४२१३ ८०९.१२
मुळशी   ६००८ २१२३.६१
मावळ १२,७१४ ५४३६.७७
हवेली १३,२०२   ४७२६.६३
जुन्नर   ५६,५१३ २७५२३
आंबेगाव ३२,७७४ १५८२३.३६
खेड ३५,३८९ १२,१६३.७०
शिरूर   १२,०९८ ६२८९.०७
पुरंदर  १९,३१६ १५४३.०९
बारामती २९,१७३ १७२८.८०
इंदापूर १८,४१५  ९५९०.०४
दौंड १५,५९४  ७९२२.०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com