भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस

भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस

पुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या उघडपीनंतर मध्यरात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. भोर, दौंड, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक होतो. भोर तालुक्यातील संगमनेर येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भाटघर, वीर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. भाटघरमधून ७ हजार ६००, तर वीर धरणातून ४२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.    

भोर तालुक्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. संगमनेर येथे १६८ मिलिमीटर पावसाची, तर भोर येथे ८६, भोलावडे ९३, किकवी १०५, आंबवडे येथे ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वेल्हा येथे ६५ मिलिमीटर, खेड तालुक्यातील आळंदी येथे ७२ मिलिमीटर, दौंडमधील देऊळगाव राजे येथे ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या क्षेत्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील भाटधर धरण क्षेत्रात १२१ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणातून ७ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने सकाळी सुमारे ५४ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दुपारी हे पाणी ४१ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आले. उजनीतून ३१ हजार, तर नाझरे धरणातूनही १४ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत धरणांतूनही पाणी सोडण्यात आले. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : पुणे वेधशाळा ४२, खडकवासला ३४, पौड ४०, घोटावडे ४५, माले ४७, मुठा ६०, पिरंगुट ३९, भोर ८६, भोलावडे ९३, नसरापूर ५७, किकवी १०५, वेळू ४९, आंबवडे ८८, संगमनेर १६८, निगुडघर ३६, वडगाव मावळ २२, तळेगाव ३४, काळे कॉलनी ३९, वेल्हा ६५, पानशेत ५७, विंझर ४१, आंबवणे ४६, कुडे ३७, आळंदी ७२, कडूस ४०, टाकळी ३२, वडगाव रसाई ५०, न्हावरा ३०, तळेगाव ३६, रांजणगाव ३५, कोरेगाव ३०, पाबळ ३८, शिरूर ४७, देऊळगाव राजे ६८, पाटस ३८, केडगाव ४९, वरवंड ३७, सासवड ४४, भिवडी ३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com