लातूर, नांदेडमध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरणी

overtake average sowing in Latur, Nanded
overtake average sowing in Latur, Nanded

लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांत यंदा सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९ टक्‍के रब्बी पेरणी उरकली आहे. लातूर व नांदेड जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. इतर जिल्ह्यांत अपेक्षित रब्बी पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. 

लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्‍टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात ११ लाख ८ हजार १७२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी उरकली आहे. लातूर जिल्ह्यात रब्बी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९५ हजार १६३  हेक्‍टर होते. त्या तुलनेत २ लाख ८८ हजार ४४ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ३१ हजार ४९६ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात ३ लाख १७ हजार ५७० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ५५५ हेक्‍टर आहे. १ लाख ७७ हजार ४६७ हेक्‍टरवर पेरणी झाली. परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १ हजार ४३१ हेक्‍टर आहे. त्यापैकी २ लाख २० हजार ९६० हेक्‍टरवर पेरणी झाली. हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८५ हेक्‍टर आहे. १ लाख ४ हजार १३१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाल्याची माहिती लातूर कृषी विभागाच्या देण्यात आली. 

हरभऱ्याला पसंती 

यंदाच्या रब्बी हंगामात लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हरभऱ्याला प्रथम पसंती दिली आहे. इतर कडधान्य व मक्याचीही सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. ज्वारी व गव्हाची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७० टक्‍केही झाली नसल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

पाच जिल्ह्यांतील पीकनिहाय पेरणी (हेक्‍टरमध्ये)

रब्बी ज्वारी    ३१६७२०
गहू  ९०४८६
रब्बी मका १०३९४
इतर तृणधान्य  १३०७
हरभरा ६६५६०२
इतर कडधान्य २५९५
करडई   १७६०८
जवस ९२६
रब्बी सूर्यफूल १४८०
इतर गळीत धान्य १०५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com