केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा

केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा

नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता शेतकरी आणि बाजार समितीकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने शुक्रवार (ता. १४) लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक, देयकाची चुकवती आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली.  चालू वर्षाच्या खरीप कांदा उत्पादनात एकरी उत्पादकता घटल्याने उत्पादनखर्च व मिळत असलेले उत्पन्न यात तफावत आहे. उत्पादकांचा खर्चही निघणे मुश्कील झाल्याने कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी जोर धरत असताना केंद्रीय पथकातील सदस्य कृषी विभागाचे विशेष सचिव राजेश वर्मा व अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्रन यांनी लासलगाव बाजार समितीत दररोज येणारी आवक, असलेले बाजारभाव आणि कांद्याची लिलावाची पद्धतीची माहिती जाणून घेतली. ‘‘कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर दोन सदस्यीय पथकाने निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे संपूर्ण अहवाल देणार,’’ असल्याचे आश्वासन या पथकाने दिल्याची माहिती  लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. निर्यातबंदीचे निर्बंध उठवा  शेतकऱ्यांनी आणि बाजार समितीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर असलेले निर्बंध तातडीने उठवण्याची मागणी पथकाकडे केली. या वेळी माजी उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे यांसह शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com