Agriculture news in marathi Overview of onion market in Lasalgaon by the Central team | Page 2 ||| Agrowon

केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा बाजाराचा आढावा

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता शेतकरी आणि बाजार समितीकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने शुक्रवार (ता. १४) लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक, देयकाची चुकवती आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली. 

नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता शेतकरी आणि बाजार समितीकडून कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने शुक्रवार (ता. १४) लासलगाव बाजार समितीस भेट देऊन कांदा लिलाव, कांद्याची दररोज होणारी आवक, देयकाची चुकवती आणि बाजारभावाची माहिती घेऊन पाहणी केली. 

चालू वर्षाच्या खरीप कांदा उत्पादनात एकरी उत्पादकता घटल्याने उत्पादनखर्च व मिळत असलेले उत्पन्न यात तफावत आहे. उत्पादकांचा खर्चही निघणे मुश्कील झाल्याने कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी जोर धरत असताना केंद्रीय पथकातील सदस्य कृषी विभागाचे विशेष सचिव राजेश वर्मा व अपेडाचे उपमहाव्यवस्थापक आर. रवींद्रन यांनी लासलगाव बाजार समितीत दररोज येणारी आवक, असलेले बाजारभाव आणि कांद्याची लिलावाची पद्धतीची माहिती जाणून घेतली. ‘‘कांद्याला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपये बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर दोन सदस्यीय पथकाने निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे संपूर्ण अहवाल देणार,’’ असल्याचे आश्वासन या पथकाने दिल्याची माहिती  लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

निर्यातबंदीचे निर्बंध उठवा 
शेतकऱ्यांनी आणि बाजार समितीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर असलेले निर्बंध तातडीने उठवण्याची मागणी पथकाकडे केली. या वेळी माजी उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे यांसह शेतकरी उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...