Agriculture news in Marathi Overview of Warud station by train for orange transport | Agrowon

संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड स्थानकाचा आढावा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या हंगामात संत्रा वाहतूक केली जाणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वेच्या अभियांत्रिकी व वाणिज्य विभागाचे अधिकाऱ्यांनी वरुड रेल्वे स्थानकावरील तयारीचा आढावा घेतला.

अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या हंगामात संत्रा वाहतूक केली जाणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वेच्या अभियांत्रिकी व वाणिज्य विभागाचे अधिकाऱ्यांनी वरुड रेल्वे स्थानकावरील तयारीचा आढावा घेतला.

विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ७० हजार हेक्टर लागवड अमरावती जिल्ह्यात असून त्यामध्ये वरुड व मोर्शी हे तालुके आघाडीवर आहेत. आंबट-गोड चवीच्या नागपुरी संत्र्यांचा सर्वांत मोठा आयातदार बांगलादेश आहे. या भागातून बांगलादेशला मोठी निर्यात होते. रस्ते मार्गाने बांगलादेश पर्यंत संत्रा पोहोचविला जातो. परंतु हा पर्याय खर्चीक आणि वेळकाढू ठरत असल्याने रेल्वेने संत्रा वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी या भागातील संत्रा प्रक्रिया उद्योजक व शेतकऱ्यांची होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होते. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने वरुड रेल्वे स्थानक ते बांगलादेशमधील बेनापोल या स्थानकापर्यंत रेल्वे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी वरुड रेल्वे स्थानकावर असलेल्या सुविधांची आढावा रेल्वेच्या अभियांत्रिकी वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला.  

संत्रा लोडिंग साठी सोयी सुविधा निर्माण करणे, दोन्ही प्लॅटफॉर्मला जोडून मालधक्क्याची उभारणी याबाबत अधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील, नितीन वर्मा, श्रीनिवास घोटकर, मनीष नागले, टि. पी. आचार्य, सोनू खान, सज्जाद खान, रियाज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे ताज खान मजले खान, रमेश जिचकार, श्रमजीवी संत्रा कंपनीचे अध्यक्ष नीलेश मगरदे, पुंडलिक हरले उपस्थित होते.

 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...