नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७.८२६ मेट्रिक टन प्राणवायू

नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून ''ऑक्सिजन एक्स्प्रेस''च्या माध्यमातून दोन टँकरच्या द्वारे २७.८२६ मेट्रिक टन प्राणवायू प्राप्त झाला आहे’’, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिली.
By Oxygen Express 27,826 metric tons of oxygen

विशाखापट्टणम् येथून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे चार टँकर्स उतरविण्यात आले आहेत. यापैकी दोन टँकर्स नाशिक व दोन टँकर्स नगर जिल्ह्यासाठी आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण २७.८२६ मेट्रिक टन आणि नगर जिल्ह्यासाठी २४.७३६ मेट्रिक टन असे एकूण ५२.५६० मेट्रिक टन प्राणवायूचे चार टँकर्स प्राप्त झाले.

नाशिक जिल्ह्यासाठीच्या २७.८२६ मेट्रिक टनांपैकी चार मेट्रिक टन  प्राणवायूचा साठा धुळे जिल्ह्यास देण्यात येईल. यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी २३.८२० मेट्रिक टन इतका साठा शिल्लक राहील, असे नडे यांनी कळविले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com