Agriculture news in marathi P. R. The next president of Patil Sugar Association | Agrowon

पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष : पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जानेवारी 2021

 सहकार क्षेत्रातील कामाचा पन्नास वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता. २२) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली. 

कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील कामाचा पन्नास वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता. २२) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली. मार्चमध्ये दांडेगावकर यांची मुदत संपेल. त्या जागी पाटील यांची नियुक्ती होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या पी. आर. पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार झाला. माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. ‘‘गाथा पांडुरंगाची’’ या गौरव अंकाचे प्रकाशनही झाले.

पवार म्हणाले, ‘‘कृषी व साखर कारखाना क्षेत्रातील दीर्घ अनुभव असणाऱ्या पी. आर. पाटील यांची निवड योग्य ठरेल. जागतिक बदल, सहकारातील जाण असणाऱ्यांची गरज आहे. ते पदाला न्याय देतील. भविष्यात उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. उसाच्या चोथ्यापासून वीजनिर्मिती व रेक्‍टीफाय स्पिरीट करावे. घरी वापरात येणारा ईएनजी गॅस तयार करावा लागेल,  त्यासाठी पी. आर. पाटील यांच्यासारखा नेता हवा. राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली पी. आर. पाटील यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली. सलग ५१ वर्षे सहकारी साखर कारखान्यात संचालक, २५ वर्षे अध्यक्ष राहणे सोपे नाही.’’

पी. आर. पाटील म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव, शाहू महाराज, लोकनेते राजारामबापू हेच दैवत आहेत. अध्यक्षपदाच्या काळात जयंत पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली एका कारखान्याच्या चार शाखा झाल्या.’’


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...