नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष : पवार
सहकार क्षेत्रातील कामाचा पन्नास वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता. २२) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली.
कुरळप, जि. सांगली : सहकार क्षेत्रातील कामाचा पन्नास वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता. २२) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली. मार्चमध्ये दांडेगावकर यांची मुदत संपेल. त्या जागी पाटील यांची नियुक्ती होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या पी. आर. पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार झाला. माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते. ‘‘गाथा पांडुरंगाची’’ या गौरव अंकाचे प्रकाशनही झाले.
पवार म्हणाले, ‘‘कृषी व साखर कारखाना क्षेत्रातील दीर्घ अनुभव असणाऱ्या पी. आर. पाटील यांची निवड योग्य ठरेल. जागतिक बदल, सहकारातील जाण असणाऱ्यांची गरज आहे. ते पदाला न्याय देतील. भविष्यात उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. उसाच्या चोथ्यापासून वीजनिर्मिती व रेक्टीफाय स्पिरीट करावे. घरी वापरात येणारा ईएनजी गॅस तयार करावा लागेल, त्यासाठी पी. आर. पाटील यांच्यासारखा नेता हवा. राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली पी. आर. पाटील यांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली. सलग ५१ वर्षे सहकारी साखर कारखान्यात संचालक, २५ वर्षे अध्यक्ष राहणे सोपे नाही.’’
पी. आर. पाटील म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव, शाहू महाराज, लोकनेते राजारामबापू हेच दैवत आहेत. अध्यक्षपदाच्या काळात जयंत पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली एका कारखान्याच्या चार शाखा झाल्या.’’