Agriculture news in marathi The pace of crop disbursement in Jalgaon is very slow | Agrowon

जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत. परंतु, पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे.

जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी शेती, पीक कर्ज वितरण, निधीबाबत रोज नव्या घोषणा करीत आहेत. परंतु, पीक कर्ज वितरणाची गती मात्र अतिशय संथ आहे.

अनेक बॅंका पीक कर्जासंबंधी काम करायला तयार नाहीत. महिनाभर थांबा, असे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. परंतु, जूनअखेरपर्यंत फक्त ९०३ कोटी रुपये पीक कर्ज वितरीत झाले आहे. 

कोरोनाचे कारण सांगून जळगाव शहरासह यावल, चोपडा, पाचोरा भागातील राष्ट्रीयीकृत बॅंका शेतकऱ्यांना बॅंकेत येण्यास मज्जाव करीत होत्या. धुळे जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. तेथे सुमारे ११०० कोटी रुपये पीककर्ज वितरण लक्ष्यांक आहे. पैकी ३८० कोटीदेखील वितरण झालेले नाही. तर, नंदुरबारात सुमारे ६०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे आहे. यातील २३० कोटीच कर्ज वितरण पूर्ण झाल्याची माहिती मिळाली. 

पीक कर्जवाटपाचा अघोषित बंद राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पुकारला आहे. फक्त जिल्हा बॅंकेचे कामकाज सुरळीत सुरू होते. ग्रामीण, राष्ट्रीयीकृत बॅंका शेती, पीक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारणे, बॅंक खाते उघडणे, माहितीमध्ये दुरुस्ती करून कर्ज वाढवून देणे, याची कुठलीही कामे करायला तयार नाहीत. 

लोकप्रतिनिधीही गप्प

कोरोनाची कारणे सांगून शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शाखांमधून परत पाठविले जात आहे. अग्रणी बॅंकेचे कुठलेही अधिकारी यासंदर्भात ठोस जबाबदारीने काम करायला तयार नाहीत. पीक कर्जवाटप जुलै महिना अर्धा संपण्यात आला, तरीदेखील कमीच असल्याने प्रशासनाची उदासिनता स्पष्ट होत आहे. कुणी याबाबत बैठका घेत नाही. लोकप्रतिनिधीही गप्प आहेत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...