ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस
जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या आठवड्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस झाला असून, या भागातील नदी, नाल्यांना मोठे प्रवाही पाणी आले आहे.
जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या आठवड्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस झाला असून, या भागातील नदी, नाल्यांना मोठे प्रवाही पाणी आले आहे.
चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातही पावसाने शंभरी गाठली आहे. यावल, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील अनेक भागांतील कच्चे रस्ते वाहून गेले आहेत. जामनेरातही पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. बुधवारी (ता. १८) खानदेशात धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर येथे जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पारोळा, चोपड्यात तर नंदुरबारमधील धडगाव, अक्कलकुवा, नवापुरात अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.
धडगाव व अक्कलकुवा भागांतील सातपुडा पर्वतात काही ठिकाणी ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पाचोरा, चाळीसगाव येथे तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे नाल्यांना पूर आला. जळगाव, बोदवड, भुसावळ भागांत मात्र पावसाचा बुधवारी जोर नव्हता. काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी (ता. १९) सकाळी अनेक भागांत स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण होते. परंतु, पुन्हा ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरण तयार झाले. ऊन सावल्यांचा खेळ सुरूच होता.
खानदेशात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यात मागील ३० दिवसांमध्ये २८ दिवस पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यात १८० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १४५ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. नंदुरबारात पाऊस १७५ टक्क्यांवर झाला आहे.
गुरुवारी (ता. १९) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः जामनेर २१, पाचोरा २८, चाळीसगाव २१, चोपडा १८, जळगाव नऊ, धरणगाव ११, पारोळा ११, एरंडोल १७. धुळे ः शिंदखेडा ११, धुळे नऊ, साक्री १७.
- 1 of 1026
- ››