Agriculture news in marathi; Pachora and Jamnar also received 5 percent rainfall | Agrowon

पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या आठवड्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस झाला असून, या भागातील नदी, नाल्यांना मोठे प्रवाही पाणी आले आहे. 

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या आठवड्यातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊस झाला असून, या भागातील नदी, नाल्यांना मोठे प्रवाही पाणी आले आहे. 

चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्‍यातही पावसाने शंभरी गाठली आहे. यावल, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर या तालुक्‍यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे पाचोरा तालुक्‍यातील अनेक भागांतील कच्चे रस्ते वाहून गेले आहेत. जामनेरातही पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. बुधवारी (ता. १८) खानदेशात धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर येथे जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पारोळा, चोपड्यात तर नंदुरबारमधील धडगाव, अक्कलकुवा, नवापुरात अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.

धडगाव व अक्कलकुवा भागांतील सातपुडा पर्वतात काही ठिकाणी ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पाचोरा, चाळीसगाव येथे तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे नाल्यांना पूर आला. जळगाव, बोदवड, भुसावळ भागांत मात्र पावसाचा बुधवारी जोर नव्हता. काही भागांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी (ता. १९) सकाळी अनेक भागांत स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण होते. परंतु, पुन्हा ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरण तयार झाले. ऊन सावल्यांचा खेळ सुरूच होता. 

खानदेशात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यात मागील ३० दिवसांमध्ये २८ दिवस पाऊस झाला आहे. साक्री तालुक्‍यात १८० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १४५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. नंदुरबारात पाऊस १७५ टक्‍क्‍यांवर झाला आहे. 

गुरुवारी (ता. १९) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः जामनेर २१, पाचोरा २८, चाळीसगाव २१, चोपडा १८, जळगाव नऊ, धरणगाव ११, पारोळा ११, एरंडोल १७. धुळे ः शिंदखेडा ११, धुळे नऊ, साक्री १७. 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...