agriculture news in marathi paddy advisory | Agrowon

भातसल्ला (कोकण विभाग)

डॉ. विजय मोरे,
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत  ठेवावी.

पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत  ठेवावी.

  • फुटवे ते पोटरी अवस्था (गरव्या जाती), पोटरी ते फुलोरा अवस्था (निमगरव्या जाती), फुलोरा ते दाणे भरणे अवस्था (हळव्या जाती) 
  • पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत  ठेवावी. निम गरवे भात पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत  ठेवावी. यासाठी शेताची बांध बंदिस्ती किंवा बाह्य स्रोतातून पाणी घेऊन आवश्यक पाणी पातळी उपलब्ध करावी. 
  • निमगरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा १७ किलो युरिया प्रति एकरी द्यावी. 
  • भात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाणी साठून राहणाऱ्या पाणथळ भात शेतीमध्ये निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता २-३ दिवसांच्या अंतराने फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. 
  • सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी बाहेरून पाणी उपलब्ध करणे शक्य असल्यास भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाणी साठवण करण्याची व्यवस्था करावी. गरज भासल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी  कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम.
  • पुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, ढगाळ वातावरण संभवते. पाणथळ भागातील भात खाचरातील साठलेल्या पाण्याचे तापमान वाढल्यास व दाट लागवड आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ( ५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मिली. तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.
  • पावसाची उघडझाप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे माळ जमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात, तसेच लोंब्या कुरतडून खातात. त्यांच्या नियंत्रणासाठी भात खाचरात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. सकाळी किंवा सायंकाळी भात खाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळणी करावी.
    (टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.) 

संपर्क- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


इतर कृषी सल्ला
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
तृणधान्य पिकांमध्ये प्रक्रियेला संधीशेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
गरज संरक्षित जल सिंचनाचीसंरक्षित सिंचन व्यवस्था हा एक चांगला पर्याय...
फळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा  वाढीची अवस्था  पावसाची...
भातसल्ला (कोकण विभाग)पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
कृषी सल्ला (सोयाबीन, ऊस, खरीप ज्‍वारी,...संत्रा / मोसंबी फळबागेत रसशोषक पतंगांच्‍या व्‍...
केळी बाग व्यवस्थापनसध्या केळी बागेतील मृगबाग मुख्य वाढीच्या तर...
हवामान घटकांचा पिकावर होणारा परिणामहवामान घटकांमध्ये प्रामुख्याने ऊन, वारा, पाऊस,...
काही ठिकाणी चांगला पाऊस; काही ठिकाणी...या आठवड्याच्या सुरुवातीपासून बुधवारपर्यंत (ता.१६...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
लिंबूवर्गीय फळपिकावरील कोळीचे व्यवस्थापनकोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी...
कृषी सल्ला (ऊस, भात, मूग/उडीद, तूर,...बऱ्याच ठिकाणी नदी, नाले किंवा ओढे यांच्यामुळे...
केळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा...
काडीची परिपक्वता, पानगळ या समस्यांकडे...गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये...
कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजीएकात्मिक कीड व्यवस्थापनात किडीची संख्या आर्थिक...
बहुउपयोगी, आरोग्यदायी शेवगाशेवगा त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणांमुळे...
ऑगस्टअखेर मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक...मागील भागात आपण मराठवाडा विभागातील मान्सूनचे आगमन...
पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात...मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या...