agriculture news in marathi paddy crop affected in Sindhudurg due to rain | Page 3 ||| Agrowon

सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. नियमितपणे सायकांळी चार वाजल्यानंतर पाऊस पडत असल्यामुळे भात कापणी रेंगाळली आहे. काही ठराविक वेळेतच कापणी, झोडणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडक उन्हं आणि सायकांळी चार वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस असेच समीकरण तयार झाले आहे. नियमितपणे पाऊस पडत असल्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली भातपिकाची कापणी रेंगाळली आहे. सकाळच्या सत्रातच कापणी, झोडणी करून शेतकऱ्यांना आवराआवर करावी लागत आहे. भातपिकाप्रमाणे नाचणी पिकांची काढणी देखील रखडली आहे.

दरम्यान, रविवारी सायकांळी पाच वाजल्यानंतर वैभववाडी, कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात तर सलग सात दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या भागातील ९५ टक्के भातपिकाची कापणी झाली आहे. परंतु नाचणी पिकांची कापणी रखडली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे दुपारपर्यंत काम शेतकऱ्यांना करता येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...