agriculture news in marathi, paddy crop damage due to heavy rain, sindhudurga, maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात शेतीला दणका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सोमवारी (ता. २१) सायंकाळी देखील विजांच्या कडकडाटांसह पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदीनाल्यांमधील पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच, पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सोमवारी (ता. २१) सायंकाळी देखील विजांच्या कडकडाटांसह पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदीनाल्यांमधील पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच, पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस सुरूच आहे. सोमवारी सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री बारा वाजेपर्यंत सुरूच होता. पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भात शेतांमध्ये पाणी साचल्याने पीक तरंगत आहे. या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी तासभर सूर्यदर्शन झाले. त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान झाले. पाऊस पडण्याच्या शक्यतेने कापणी केलेले भात पीक बांधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू होती.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...