agriculture news in marathi, paddy crop demonstration project, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक प्रात्यक्षिक प्रकल्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांत एकूण २२० हेक्टरवर भातपीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ४७ लाख ५ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भात उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांत एकूण २२० हेक्टरवर भातपीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ४७ लाख ५ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भात उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाअंतर्गत भात उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प ‘आत्मा’कडे नोंदणीकृत असलेल्या गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे १८ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पीक पद्धतीवर आधारित चार प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. दहा हेक्टरचा एक प्रकल्प असून, गटातील प्रत्येक शेतकऱ्याला एक एकराचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मानसिकता असलेल्या शेतकरी गटांची निवड केली जाणार आहे. 

यामध्ये शेतकरी प्रशिक्षणे, ग्रामबीजोत्पादन, प्रमाणित बियाणे दिले जाणार असून खते, जैविक खते, जैविक कीटकनाशकांची खरेदी गटांना करावी लागणार आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे गटांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

सध्या भातपट्ट्यातील खडकाळा (ता. मावळ), संगमनेर (ता. भोर) व भुकूम (ता. मुळशी) येथे ‘फुले समृद्धी़’ या वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत; तसेच तालुका बीज गुणन केंद्र किंवा फळरोपवाटिका केंद्रावर युरिया ब्रिकेटसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय निवडलेल्या शेतकरी गटांना कृषीतज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. 

 

तालुकानिहाय भात लागवड प्रात्यक्षिके 
तालुका प्रात्यक्षिक प्रकल्प (प्रतिदहा हेक्टरप्रमाणे) 
भोर
वेल्हा २ 
मावळ
मुळशी
हवेली
खेड
आंबेगाव
जुन्नर
पुरंदर

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...