पुणे जिल्ह्यात ३५० हेक्‍टरवर भात पीक प्रात्यक्षिक प्रकल्प

भात पीक
भात पीक
पुणे ः भात उत्पादन वाढीसाठी खरीप हंगामात जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यांत ३५० हेक्टरवर भात पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भात उत्पादकांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर यांनी केले. 
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत भात उत्पादन वाढविण्यासाठी आत्माकडे नोंदणीकृत असलेले गटांना प्रकल्पाकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये एसआरटी पद्धतीने भात लागवडीचे २९ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात पीक पद्धतीवर आधारित सहा प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहे. दहा हेक्‍टरचा एक प्रकल्प असून गटातील प्रत्येकी शेतकऱ्यांना एक एकराचा लाभ दिला जाणार आहे.
यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची मानसिकता असलेल्या शेतकरी गटांची निवड केली जाणार आहे. यामध्ये शेतकरी गटांना बियाणे दिले जाणार असून रासायनिक तसेच जैविक खतांची खरेदी गटांना करावी लागणार आहे. त्यानंतर डीबीटीद्वारे गटांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
सध्या भात पट्यातील खडकाळा (ता. मावळ), संगमनेर (ता. भोर) व भूकूम (ता. मुळशी) या फार्मवर फुले समृद्धी या वाणाचे बियाणे उपलब्ध आहे. तसेच या फार्मवर, तालुका बीज गुणन केंद्र किंवा फळ रोपवाटिका केंद्रावर युरिया ब्रिकेट सुद्धा दिले जाणार आहे. 
तालुकानिहाय भात लागवडीचे प्रात्यक्षिके ः (हेक्‍टरमध्ये)
तालुका प्रात्यक्षिक प्रकल्प
भोर
वेल्हा ४ 
मावळ
मुळशी
हवेली ३ 
खेड
आंबेगाव
जुन्नर
एकूण ३५

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com