पुणे जिल्ह्यात भात लागवडी आटोपल्या

पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन ऑगस्टपासून भात पट्ट्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लागवडीला चांगला वेग आला आहे. आता लागवडी उरकल्या आहेत.
Paddy cultivation has been completed in Pune district
Paddy cultivation has been completed in Pune district

पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन ऑगस्टपासून भात पट्ट्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लागवडीला चांगला वेग आला आहे. आता लागवडी उरकल्या आहेत. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी ५७ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५१ हजार ८७३ हेक्टर म्हणजेच जवळपास ८९ टक्के भाताची पुर्नलागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

सध्या अनेक ठिकाणी लवकर लागवडी झालेली भात पीके वाढीच्या अवस्थेत आहे. शेवटच्या टप्यात झालेल्या पावसामुळे भात पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस अशाच पावसाच्या सरी बरसत राहिल्यास भात पीक शेतकऱ्यांच्या हाताशी येतील.

गेल्या महिन्यात जिल्हयातील पश्चिम भागात काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. दोन ऑगस्ट रोजी पुन्हा तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने भात लागवडी केल्या आहेत.  पश्चिम भागातील लवकर दाखल झालेल्या पावसामुळे रोपवाटिका वेळेत टाकल्या असल्या तरी पुरेसा पाऊस न झाल्याने उशीराने लागवडी झाल्या आहेत.

चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागातील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या. त्यामुळे रोपवाटिकेच्या क्षेत्रात घट काही प्रमाणात घट झाली आहे. आत्मा योजनेअंतर्गत यांत्रिकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. 

जुन्नरची आघाडी

जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नऊ हजार ६२७ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मावळ तालुक्यात नऊ हजार २२२ हेक्टर, भोर तालुक्यात सात हजार २०० हेक्टर, खेडमध्ये सात हजार १३९ हेक्टर, मुळशीमध्ये सहा हजार ३१७, वेल्हे ४ हजार ९७७, आंबेगावमध्ये चार हजार २५०, हवेली एक हजार ७२९, पुरंदरमध्ये एक हजार ४१२ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com