Paddy cultivation on protected water due to lack of rain
Paddy cultivation on protected water due to lack of rain

पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवड

नाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस नसल्याने भातरोपे लागवडीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्यावरलागवड सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस नसल्याने भातलागवड लांबणीवर गेली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक भागांत हीच परिस्थिती आहे; तर कळवण, सुरगाणा, पेठ व सटाणा तालुक्यात अजूनही लागवडी सुरू झालेल्या नाहीत. मात्र, रोपे लागवडीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्यावर शेतात चिखल करून लागवड सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, वैतरणा, नागुसली, म्हासुरली, सांजेगाव या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने लागवडी सुरू आहेत. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत. इगतपुरी हा जिल्ह्यातील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. मात्र, भौगोलिक विचार केल्यास तालुक्याच्या निम्म्याहून अधिक भागात चालू वर्षी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर झालेल्या पावसानंतर भात बियाणे टाकून रोपे तयार करण्याची लगबग दिसून आली. आता भातरोपांची वाढ जास्त झाली असून, पाऊस नसल्याने रोपे खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे पूर्व भागातील टाकेद, बेलगाव, तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर यांसह काही गावांतील शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून विहिरीतील संरक्षित; तसेच दारणा धरणातील उचल पाण्याची असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात मोटारी चालू केल्या आहेत. यातून तयार झालेल्या चिखलात लागवडी सुरू झाल्या आहेत.

लागवडीला वीजपुरवठ्याचा खोडा पाऊस नसल्याने पर्यायी संरक्षित पाण्यावर लागवडी सुरू आहेत; परंतु वीजपुरवठा उच्चदाबाने होत नसल्याने कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत.

सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील वर्षी हंगामाच्या कामकाजाला या दिवसांत गती होती. मात्र, सध्या भातरोपे तयार असून लागवडीला अडचणी येत आहेत. - वसंत भोसले, माजी सरपंच, धामणी, ता. इगतपुरी

पेरणीची स्थिती  

  • रोपवाटिका तयार आहेत मात्र, पावसाचीही प्रतीक्षा
  • उन्हाचा चटका पडल्याने भातरोपे पिवळी पडली
  • रोपे अधिक दिवसांची होऊन लागवड लांबणीवर
  • जिल्ह्यातील भात लागवडीचे क्षेत्र : ७८६१३ हेक्टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com