पुणे जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यात

भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत भात लागवड उरकण्याची शक्यता आहे. लवकर लागवड झालेले भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे, असे भात उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
Paddy cultivation in Pune district in final stage
Paddy cultivation in Pune district in final stage

पुणे ः गेल्या सात ते आठ दिवसांपासून जिल्ह्यातील भात पट्टयात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लागवडीस चांगला वेग आला आहे.  आता भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत भात लागवड उरकण्याची शक्यता आहे. लवकर लागवड झालेले भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे, असे  भात उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात दहा ते बारा दिवसांपूर्वी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून सरी बरसत असल्या तरी पावसाला जोर नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुळशी, पानशेत, वरसगाव, वडीवळे, आंध्रा, भामा आसखेड, कळमोडी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहेत.

पश्चिम भागातील लवकर दाखल झालेल्या पावसामुळे भात रोपवाटिका वेळेत टाकल्या होत्या. परंतु, अपेक्षित पावसाअभावी उशिराने लागवडी सुरू झाल्या आहेत. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी क्षेत्र ५७ हजार ९६४ हेक्टर आहे. त्यापैकी ३० हजार ६१९ हेक्टर म्हणजेच जवळपास ५२ टक्के क्षेत्रावर भाताची पुर्नलागवड झाली आहे. सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड बाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com