Agriculture news in Marathi Paddy cultivation in Ratnagiri was halted due to heavy rains | Agrowon

रत्नागिरीत जोरदार पावसाने भातशेती आडवी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

अचानक पडलेल्या पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अजूनही कृषी विभागाकडून सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी ः अचानक पडलेल्या पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अजूनही कृषी विभागाकडून सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

चार दिवसांपूर्वी परिसरात कडक ऊन पडले होते. धुकेही पडत होते. पाऊस येणार नाही असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरुवात केली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. २) सायंकाळी या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. कापलेले भात भिजले. खाचरात पाणी साचल्याने भाताच्या लोंब्या भिजल्या. त्यानंतर शनिवारी आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शुक्रवारी कापलेले भात सुकवता आले नाही.

रविवारी सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भिजलेल्या भाताकडे बघत राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. असाच पाऊस पडत राहिल्यास जमिनीवर पडलेल्या भाताला मोड येऊन भात काळे पडण्याची भीती आहे. जमिनीवर पडलेले भात कुजणार आहे.

जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीला तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्यांना पूर आला होता. त्याचा फटका आसपासच्या शेतीला बसला. त्यावेळीही कृषी विभाग महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या ग्रामसेवकांमार्फत पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतरची आर्थिक मदत अजूनही प्रक्रियेत आहे. असे असताना ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी वापरले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण भातशेतीचे नुकसान ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होते. आता उर्वरित भात शेतीपैकी ३० ते ४० टक्के भातशेती परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- अनिल भिसे, प्रगतिशील शेतकरी, मालदोली


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...