Agriculture news in Marathi Paddy cultivation stalled in Akola | Agrowon

अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यात पावसाने विश्रांती घेतल्याने भातलागवडी रखडल्या आहेत. तब्बल महिनाभर उशीर होऊनही पाऊस नसल्याने आदिवासी पट्ट्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.

नगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यात पावसाने विश्रांती घेतल्याने भातलागवडी रखडल्या आहेत. तब्बल महिनाभर उशीर होऊनही पाऊस नसल्याने आदिवासी पट्ट्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आत्तापर्यंत अकोले तालुक्यात केवळ पन्नास टक्के भात लागवडी झाल्या आहेत. लागवडीला उशीर यंदा भात उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस पेक्षा अधिक गावांच्या हद्दीत जोरदार पाऊस होत असतो. या भागातील बहुतांश शेतकरी खरिपात भाताचे उत्पादन घेतात. दरवर्षी या तालुक्यात सरासरी चौदा हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा मात्र, पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. अजूनही जोरदार पाऊस नसल्याने भात लागवडी रखडल्या आहेत. आत्तापर्यंत केवळ सात हजार हेक्टरवर म्हणजे पन्नास टक्के भात लागवडी झाल्या आहेत.

यंदा सुरुवातीला चांगल्या पावसावर व पोषक हवामानामुळे शेतकऱ्यांनी भातरोपे टाकून खरिपाची जोरदार सुरुवात केली. भाताची उगवण चांगली झाली; मात्र सद्यःस्थितीत पावसाने ताण दिल्याने भातरोपे जास्त वयाची झाली आहेत. यंदा लागवडीला महिनाभर उशीर झाला आहे. अजूनही जोरदार पाऊस नसल्याने भात लागवडी होतील की नाही याची भीती आदिवासी शेतकऱ्यांना आहे. जरी भात लागवड झाली तरी उशिराच्या लागवडीमुळे यंदा भाताच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस नसल्याने भंडारदरा, निळवंडे व मुळातही पाण्याची फारसी आवक नाही. अकोल्याच्या आदिवासी पट्‍ट्यात सुरुवातीलाच पाऊस नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...