agriculture news in marathi, paddy farmers awaiting for heavy rainfall | Agrowon

पावसाच्या खंडामुळे भात उत्पादक चिंतेत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे : ऐन खरिपाच्या तोंडावर पावसाचा खंड पडल्याने पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली तर भाताच्या लागवडी खोळंबणार असून मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

पुणे : ऐन खरिपाच्या तोंडावर पावसाचा खंड पडल्याने पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली तर भाताच्या लागवडी खोळंबणार असून मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

गेल्या महिन्यात हवामान विभागाने पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे खरिपाच्या सुरवातीला चांगला पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली होती. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन पेरणीपूर्वी करावी लागणारी नांगरणी, वखरणी अशा शेतीच्या मशागतीच्या कामांवर भर दिला होता. तसेच लागणारी खते, बी-बियाणांची तजवीज करून ठेवली होती. 

यंदा अनेक शेतकऱ्यांनी मजुरांवर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचेही नियोजन केले होते. त्यासाठी लागणारी बियाणांची उगवणक्षमतेची चाचणी करून घेतली होती. गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने माॅन्सून दाखल झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्यास सुरवात केली होती. मात्र, आता अचानक पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्या भात रोपे काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसांत रोपांची लागवड होण्याची गरज आहे. त्यासाठी चांगला पावसाची गरज आहे. पावसाच्या खंडाचा अंदाज व्यक्त केल्याने भात लागवडी वेळेवर होतील की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सध्या शेतकरी द्विधा मनस्थितीत असून भात लागवडीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.   

रोपवाटिकेत रोपे टाकून आठ दिवस झाले. पाऊस नसल्यामुळे वीस ते तीस टक्के उगवण झाली आहे. आता पावसाची गरज आहे. पाऊस झाला तर भात लागवडी होतील, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. 
- संतोष कारके, भात उत्पादक शेतकरी, डोणे, वडगाव मावळ,       

गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पाऊस झाला होता. आता पाऊस उघडला आहे. भात रोपे उगवून आली आहेत. लागवडीच्या वेळेस पाऊस न झाल्यास अडचणी होतील. 
- लक्ष्मण खेडकर, वाजेघर, ता. वेल्हा,  

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...