Agriculture news in marathi Paddy harvesting begins in Ajra taluka | Agrowon

आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात कापणीस सुरवात झाली आहे. पूर्व भाग व उत्तूर परिसरात हावळ्या भाताची कापणी सुरू झाली आहे.

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात कापणीस सुरवात झाली आहे. पूर्व भाग व उत्तूर परिसरात हावळ्या भाताची कापणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीन व भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. शेतकरी कुटुंबे भात कापणी व मळणीच्या कामात व्यस्त झाली आहेत. पावसाचाही व्यत्यय येत असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

आजरा तालुक्‍यात सप्टेंबर महिन्यापासून खरीप पिकांच्या काढणीला सुरवात होते. या काळात हाळवी भातांची कापणी, सोयाबीन व भुईमुगाची काढणी सुरू होते. आठ दिवसांपासून सोयाबीन काढणीच्या कामाला सुरवात झाली आहे. उत्तूर व पूर्व भागात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे. उत्तूर परिसरात व पूर्व भागात भाताचे हाळवी पिक घेतले जाते. हाळवी भात कापणीला सुरवात झाली आहे. 

पावसामुळे शेतात दलदल तयार झाल्याने भाताची मळणी काढणे अडचणीचे बनले आहे. त्यामुळे लोखंडी लाकडी बाजल्यावर भाताची पेंडी झोडपून त्याच बरोबर पायाने तुडवून पारंपरिक पध्दतीने मळणी काढली जात आहे. काही ठिकाणी मळणी मशीनचा वापर केला जात आहे. काही गावात भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. 

दरम्यान, तालुक्‍यात पावसाळी वातावरण कायम आहे. पावसाच्या अधेमधे सरी कोसळत असल्याने कापणी, मळणी व काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चांगली धांदल उडाली आहे. शेतकरी कुटुंबांनी शेतात तळ ठोकला आहे. दरम्यान, सोयाबीनची लागवड ७०० हेक्‍टरवर झाली असून काढणी सुरू आहे.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...