पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यात

गेल्या पंधरा दिवसांत अनेक ठिकाणी भात काढणीने वेग घेतला होता. आता पुणे जिल्ह्यातील भात काढणी अंतिम टप्यांत आली असून, उत्पादकांची ढगाळ वातावरणामुळे चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यात Paddy harvesting in Pune in final stage
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यात Paddy harvesting in Pune in final stage

पुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक ठिकाणी भात काढणी काहीशी रेंगाळली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत अनेक ठिकाणी भात काढणीने वेग घेतला होता. आता पुणे जिल्ह्यातील भात काढणी अंतिम टप्यांत आली असून, उत्पादकांची ढगाळ वातावरणामुळे चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.  

   जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ हजार ९६४ हेक्टर म्हणजेच जवळपास १०३ टक्के भाताची लागवडी झाली होती. पश्चिम पट्यात असलेले मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे तालुके ही भाताचे तालुके म्हणून ओळखले जातात. यंदा पश्चिम भागात वेळेवर पाऊस दाखल झाल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या होत्या. काही भागात पावसाचा खंड पडल्याने उशिरानेही लागवडी झाल्याचे चित्र होते. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी, फुले समृद्धी, अशा वाणाच्या भाताची लागवड केली होती. या शिवाय पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम या वाणाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु शेतकऱ्यांनी सर्वाधिक इंद्रायणी या वाणाची सर्वाधिक लागवड केली होती. सुरुवातीच्या काळात काही भागात चांगला पाऊस असल्याने भात पिके जोमात होती. परंतु वाढीच्या अवस्थेत आणि काढणीच्या अवस्थेत असताना जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे उत्पादनात घट ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यात भाताचे मोठे नुकसान झाले. ज्या ठिकाणी अधिक नुकसान झाले नाही, तेथील भात पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. मात्र, ज्या ठिकाणी उशिराने पेरणी केली होती अशा ठिकाणची काढणी आता अंतिम टप्यांत आली आहे. तर अधिक नुकसान झालेल्या ठिकाणी पिकांच्या उत्पादकतेत घट येत असल्याचे शेतकरी नितीन गायकवाड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com