ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती आडवी
रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात पडलेल्या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बदलत्या वातावरणामुळे लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत होता. त्यातून सुटण्यासाठी कापणीवर शेतकरी भर देत होता; मात्र पावसाने त्यात व्यत्यय आणला असून, जिल्ह्यातील शेकडो एकर उभी शेतं आडवी झाली आहेत. या नुकसानीची मोजदाद कृषी विभागाकडून केली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

कोकणात मॉन्सून अजूनही ठाण मांडून आहे. सुमारे ६७ हजार हेक्टरवर भातशेती लागवड करण्यात आली आहे. त्यातील हळवी बियाणे कापणी योग्य झाली आहेत. दसरा झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली होती. गेली तीन दिवस रात्रीच्या वेळी पावसाचा जोर अधिक होता.
मंडणगड, दापोली तालुक्यांतील पंचवीस ते तीस गावात शेतकऱ्यांची दैना उडालेली आहे. संगमेश्वरमधील बहुतांश गावांत गेली तीन दिवस शेतीची कामे ठप्प झालेली आहेत. याबाबत शेतकऱ्यांकडून घेतलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील शेकडो एकर भातशेती बाधित झालेली आहे. रोपांमध्ये दाणे भरले असून पावसात भिजल्याने संपूर्ण पीक शेतात आडवे होते.
शेतात पाणी साचले असल्याने भाताचे दाणे पाण्यात भिजतात. सलग पाऊस पडत राहिल्यामुळे पडून राहिलेले भात पुन्हा उगवून येण्याची भीती शेतकऱ्यांपुढे आहे. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक टाकून अंगणात कापून ठेवलेले भात वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.
- 1 of 1026
- ››