पुणे जिल्ह्यात ३४३९ हेक्टरवर भात रोपवाटिका

पुणे ः यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिमेकडील तालुक्यांत काही भागात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी लागणाऱ्या रोपवाटिकेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन हजार ४३९ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. चालू आठवड्यात चांगला पाऊस झाला तर वेळेवर भात रोपांच्या लागवडी होतील.
Paddy nursery on 3439 hectares in Pune district

गेल्या वर्षीही याच काळात पुणे जिल्ह्यात चार ते पाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या होत्या. यंदा पावसाने लवकर हजेरी लावली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकल्या आहेत. त्यातच चार ते पाच दिवसांच्या खंडाने पाऊस झाल्याने वेगाने रोपवाटिका टाकण्यास वेगाने सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिकेच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात भाताचे सरासरी ५७ हजार ९६४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी पंधरा ते वीस दिवस अगोदर रोपवाटिका शेतकरी तयार करतात. सध्या भात रोपवाटिकेची कामे अंतिम टप्प्यात आहे. तर काही वेगाने रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी भात रोवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. येत्या आठ दिवसांत चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

पुढील आठवड्यात भात रोपवाटिकेतील रोपांच्या पुनर्लागवडी सुरू होतील, अशी शक्यता आहे. यंदा अनेक शेतकरी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोपवाटिका तयार केल्या आहेत. या रोपेही लवकरच लागवडीसाठी तयार होणार असल्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com