गडचिरोलीत यंदा धान क्षेत्र वाढण्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गडचिरोली   ः जिल्ह्यात धानाचे सरासरी क्षेत्र एक लाख ५३ हजार २२८ हेक्‍टर आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर धानाची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. १ लाख ९५ हजार ३०० हेक्‍टरपर्यंत खरीप लागवड क्षेत्रात  वाढीचा अंदाज कृषी विभागाला आहे. 

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र मोठे आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्या तरी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पावसाच्या भरवशावर शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेतात. गडचिरोली जिल्ह्याता धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार २२८ हेक्‍टर आहे. यावर्षी सरासरीपेक्षा त्यात वाढीचा अंदाज असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. १ लाख ९५ हजार ३०० हेक्‍टरपर्यंत ते वाढेल, असा अंदाज कृषी विभागाला आहे.   

असे आहे या वर्षी प्रस्तावित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
चामोर्शी ३३,०००
गडचिरोली  २१,०००
कुरखेडा  ११,०००
आरमोरी  २०,०००
सिरोंचा ९०००
अहेरी  १२,०००
एटापल्ली २०,०००
धानोरा  २२,०००
कोरची   १२,०००
देसाईगंज  ११,०००
मुलचेरा  ८०००
भामरागड   ९०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com