agriculture news in marathi, paddy plantation become in last stage, ratnagiri, maharashtra | Agrowon

रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

रत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर भात लागवड पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर भात लागवड पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६९ हजार हेक्टर आहे. त्यातील सुमारे ६२ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा मोसमी पाऊस १५ जूनपासून सुरू झाला. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात २५ मे दरम्यान धुळपेरण्या होतात. मात्र यंदा पावसाची लक्षणे पाहून १ जूननंतरच धुळपेरण्या झाल्या होत्या. नियमित पेरण्याही १० जूननंतरच सुरू झाल्या. खरीप हंगाम सुमारे दहा ते बारा दिवसांनी लांबला होता. रोपांची उगवण होण्यास आणि ती लागवडयोग्य होण्यासाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे लागवडीची कामेही उशिराने सुरू झाली.

जून महिन्यात पावसाचे सातत्य नव्हते. जुलै महिन्यात पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोर धरला. आतापर्यंत भात लागवडीची ८५ टक्के कामे पूर्ण झाल्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १४३३ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सातशे मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी लागवड लांबणार आहेत. याबाबत निवळी येथील शेतकरी म्हणाले, की यंदा पाऊस चांगला आहे. लागवडी सुरू झाल्या तेव्हा अनियमित पाऊस होता. लागवडी पूर्ण झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडत आहे. आता हा जोर कमी होणे अपेक्षित आहे. 

इतर बातम्या
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
पुणे विभागात पाच लाख हेक्टरला पीकविमा...पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...