सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवड पूर्ण; नाचणी लागवड सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी लागवड वेगात सुरु आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी लागवड वेगात सुरु आहे

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील ५३ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. गेले महिनाभर भातलागवडीचे काम सुरू होते. आता भातलागवडीनंतर शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला सुरवात केली आहे. पुढील दहा ते पंधरा दिवस नाचणी लागवडीची कामे सुरू राहणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. यावर्षी दहा ते बारा दिवस पाऊस उशिराने झाल्यामुळे पेरण्यादेखील विलंबाने झाल्या. गेले महिनाभर जिल्ह्यातील शेतकरी भात लागवडीत गुंतले होते. काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी लागवडीत व्यत्यय आला. त्यानंतर सातत्याने पाऊस झाला. त्यामुळे भातलागवडीची कामे वेळेत पूर्ण झाली.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला सुरवात केली आहे. जिल्ह्यात नाचणी लागवडीचे क्षेत्रदेखील मोठे आहे. वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नाचणी लागवड केली जाते. उर्वरित तालुक्यांतदेखील काही प्रमाणात नाचणी लागवड केली जाते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाचणी लागवडीला सुरूवात झाली आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे नाचणी लागवडीत व्यत्यय येत आहे. नाचणी क्षेत्र सुमारे सहाशे ते सातशे हेक्टर आहे. साधारणपणे पुढील आठ ते दहा दिवस नाचणी लागवड सुरू असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com