Agriculture news in Marathi, Paddy production declined by 45% over last year | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच भरडला गेला आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामेही झाले आहेत; परंतु त्यातून शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्षात मिळणारी भरपाई अत्यल्पच राहणार असल्याचे चित्र आहे. कारण शासकीय पंचनामे आणि प्रत्यक्षात झालेले नुकसान यात मोठी तफावत असल्याचे एका खासगी सर्व्हेक्षणातून उघड झाले. काही शेतकऱ्यांच्या गतवर्षींच्या आणि यंदाच्या उत्पादनातील तफावत सुमारे ४५ टक्क्यांची आहे. त्यामुळे शासकीय पंचनाम्यांचा ठोकताळा निश्‍चितच शेतकऱ्यांसाठी अडचणीचा आहे.

रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच भरडला गेला आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामेही झाले आहेत; परंतु त्यातून शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्षात मिळणारी भरपाई अत्यल्पच राहणार असल्याचे चित्र आहे. कारण शासकीय पंचनामे आणि प्रत्यक्षात झालेले नुकसान यात मोठी तफावत असल्याचे एका खासगी सर्व्हेक्षणातून उघड झाले. काही शेतकऱ्यांच्या गतवर्षींच्या आणि यंदाच्या उत्पादनातील तफावत सुमारे ४५ टक्क्यांची आहे. त्यामुळे शासकीय पंचनाम्यांचा ठोकताळा निश्‍चितच शेतकऱ्यांसाठी अडचणीचा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी, धामणी, चिखलीसह पाच गावांतील चौदा शेतकऱ्यांकडील भाताच्या उत्पादनाचा आढावा खासगीस्तरावर घेतला तर त्यातून वादळातील नुकसानीचे वास्तव पुढे आले आहे. लावणीपासून ते झोडणीपर्यंत झालेल्या खर्चाचा मेळ शेतीतील उत्पादनाशी घातला तर तो आतबट्ट्याचाच ठरतो. यंदा त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांवर आली आहे. 

भातझोडणीनंतर मिळालेल्या उत्पादनाचे आकडे धक्कादायक आहेत. त्यात वादळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सुमारे ४५ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी त्या दहा शेतकऱ्यांना मिळून १२,१०० किलो भात उत्पादन होते. यंदा त्याच जमिनीत केलेल्या लागवडीतून अवघे ६,४५० किलो भात उत्पन्न झाले आहे. या गावातील शेती मळ्याची असून त्यांची जर अशी परिस्थिती असेल तर नदी किनारी भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट राहणार आहे. याकडे प्रशासन कोणत्या नजरेतून लक्ष देणार हे पाहणे आवश्यक आहे. 

शासकीय मदत ही हेक्टरी येणाऱ्या खर्चाच्या निकषावरुन दिली जाते. त्यामुळे ती हेक्टरी ६,८०० रुपये इतकी निश्‍चित केली आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पादनावर पाणी फेरले आहे. त्याचा विचार शासन करणार का? हा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसते; मात्र त्यातील उत्पादन किती याबाबत कोणतीच नोंद झालेली नाही. काढणीनंतर झोडणी केल्यावर आलेले उत्पादनाची माहिती घेतली तर नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

अतिपाऊस, कीड आणि जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातझोडणीची कामे सुरू झाली असून उत्पादनावर झालेले परिणाम दिसू लागले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये चार एकर भातशेतीमधून पाच टन भात मिळते; परंतु यंदा साडेतीन टनच भात आम्हाला मिळाला. सुमारे दीड टन नुकसान सहन करावे लागले आहे.
- प्रकाश रांजणे, शेतकरी, धामणी, ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...
हलक्या पावसामुळे वाढली धास्तीपुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय...
दोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम...
भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे...भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने...
डिसेंबर ते फेब्रुवारीत अशी असेल थंडी;...नवी दिल्ली ः डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात...
मिश्रखतांसाठी विनापरवानगी कच्चा माल...पुणे : राज्यात गेले दीड वर्ष मिश्र खतांसाठी कच्चा...
शरीराचा एक पाय अपघाताने गेला असला,...कोल्हापूर ः नियतीने शरीर अपंग केले... पण मनाची...
कपाशीचा झाला झाडा, शेतात नुसत्या पऱ्हाटीनांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी...मुंबई  ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व...