यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात भाताची लागवड चांगली आहे. गरजेइतक्या पावसामुळे पीक चांगले येण्याची शक्यता असल्याने यंदा भाताचे उत्पादन वाढेल, असा अंदाज आहे.
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता Paddy production is likely to increase this year
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता Paddy production is likely to increase this year

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात भाताची लागवड चांगली आहे. गरजेइतक्या पावसामुळे पीक चांगले येण्याची शक्यता असल्याने यंदा भाताचे उत्पादन वाढेल, असा अंदाज तांदूळ उद्योगातील सूत्रांचा आहे. उत्पादन वाढले तरी देशात सर्व उद्योग, व्यवसाय वेगात सुरू असल्याने मागणी ही चांगली राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी (२०२०मध्ये) खरीप हंगामात भाताची पेरणी सुमारे ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. या वर्षीदेखील मागील वर्षी इतकीच म्हणजे ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली.  सुरुवातीच्या विलंबानंतर यंदा भाताची लागवड नंतर गतीने झाली. त्याचे उत्पादन ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवटपर्यंत वेगवेगळ्या जातींप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये येईल. पुढे काही दिवस हवामान, निसर्गातील बदल किंवा काढणीच्या वेळी अतिपावसामुळे भाताचे नुकसान झाले नाही तर यावर्षी तांदळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी (२०२० - २१)मध्ये देशात तांदळाचे एकूण उत्पादन ११.९८ कोटी टन झाले होते. ते या वर्षी प्रथमच १२ कोटी टन पेक्षा जास्त होईल असा अंदाज सूत्रांचा आहे.  तांदळाचे उत्पादन जरी जास्त झाले, तरी या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव गेल्या वर्षीपेक्षा जास्त निघतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोविडची लाट असताना निर्यात कमी झाली. यामुळे राइस मिलरनी तांदळाची खरेदी कमी केली. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असला, तरी सध्या बाजारपेठा खुल्या आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी चांगली राहील. निर्यातीत ही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट, मोठ्या कंपन्यासुद्धा सुरू होत आहेत. तांदळाची उत्पादन स्थिती  (कोटी टन) २०१८-१९.....११.६४  २०१९-२०.....११.८४ २०२०-२१.....११.९८ २०२१-२२.....१२ टन (अंदाज)  

प्रतिक्रिया

येत्या दोन ते तीन महिन्यांत  तांदळाची मागणी पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीपेक्षा  ५ ते १० टक्के दरवाढ होईल. - राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष  फेडरेशन ऑफ असोसिएशन्स  ऑफ महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com