Agriculture News in Marathi Paddy production is likely to increase this year | Agrowon

यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता

राजकुमार चौगुले
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात भाताची लागवड चांगली आहे. गरजेइतक्या पावसामुळे पीक चांगले येण्याची शक्यता असल्याने यंदा भाताचे उत्पादन वाढेल, असा अंदाज आहे.

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात भाताची लागवड चांगली आहे. गरजेइतक्या पावसामुळे पीक चांगले येण्याची शक्यता असल्याने यंदा भाताचे उत्पादन वाढेल, असा अंदाज तांदूळ उद्योगातील सूत्रांचा आहे. उत्पादन वाढले तरी देशात सर्व उद्योग, व्यवसाय वेगात सुरू असल्याने मागणी ही चांगली राहण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी (२०२०मध्ये) खरीप हंगामात भाताची पेरणी सुमारे ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. या वर्षीदेखील मागील वर्षी इतकीच म्हणजे ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली. 

सुरुवातीच्या विलंबानंतर यंदा भाताची लागवड नंतर गतीने झाली. त्याचे उत्पादन ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवटपर्यंत वेगवेगळ्या जातींप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये येईल. पुढे काही दिवस हवामान, निसर्गातील बदल किंवा काढणीच्या वेळी अतिपावसामुळे भाताचे नुकसान झाले नाही तर यावर्षी तांदळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी (२०२० - २१)मध्ये देशात तांदळाचे एकूण उत्पादन ११.९८ कोटी टन झाले होते. ते या वर्षी प्रथमच १२ कोटी टन पेक्षा जास्त होईल असा अंदाज सूत्रांचा आहे. 

तांदळाचे उत्पादन जरी जास्त झाले, तरी या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव गेल्या वर्षीपेक्षा जास्त निघतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोविडची लाट असताना निर्यात कमी झाली. यामुळे राइस मिलरनी तांदळाची खरेदी कमी केली. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असला, तरी सध्या बाजारपेठा खुल्या आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी चांगली राहील. निर्यातीत ही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट, मोठ्या कंपन्यासुद्धा सुरू होत आहेत.

तांदळाची उत्पादन स्थिती 
(कोटी टन)
२०१८-१९.....११.६४ 
२०१९-२०.....११.८४
२०२०-२१.....११.९८
२०२१-२२.....१२ टन (अंदाज)

 

प्रतिक्रिया

येत्या दोन ते तीन महिन्यांत 
तांदळाची मागणी पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीपेक्षा 
५ ते १० टक्के दरवाढ होईल.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष 
फेडरेशन ऑफ असोसिएशन्स 
ऑफ महाराष्ट्र


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...