मंडणगड : खंडीच्या शेतात अवघे सात मण भात उत्पन्न

पावसाने आमचे कंबरडे मोडले आहे. वर्षभर केलेली मेहनत वाया गेली. गतवर्षी एक खंडी भात मिळालेल्या शेतात यावर्षी फक्त सात मण भात झाला. त्यातच नांगरणीसाठी खांदी घेतलेल्या बैलांचा शेर द्यायचा आहे. निर्माण झालेली परिस्थिती शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. - शुभांगी डाकवे, शेतकरी, तुळशी
paddy production so little in larger Farm
paddy production so little in larger Farm

मंडणगड : मॉन्सूनोत्तर पावसाने भाताचे प्रचंडे नुकसान झाले आहे. त्यापोटी शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. खंडीच्या शेतात फक्त सात मण भाताचे उत्पन्न मिळाले असून सर्वसामान्य शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त झाला आहे.

क्यार वादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा मोठा फटका कोकणाला बसला. परतीचा पाऊस अनेक दिवस नियमित पावसाप्रमाणे बरसला. मंडणगड तालुक्यात तयार झालेली शेती या अवकाळी पावसात वाया गेली. प्रशासनाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार ७०० हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले असून ९ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. 

सध्या जिल्हा प्रशासनाकडे पाच कोटी रुपये वाटपासाठी प्राप्तही झाले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात पिकाखाली एकूण क्षेत्र ३७४५ हेक्टर असून १७१० शेतकरी आहेत. काढणी पश्‍चात ७६५ शेतकऱ्यांचे १४१.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ५१ हेक्टरवर विमा संरक्षण घेण्यात आलेले ६५ शेतकरी आहेत. 

अधिक पाऊस पडल्याने भरलेला दाणा पाण्यात फुगून वाया गेल्याने नुकसान झाले आहे. खंडीभर भात मिळणाऱ्या शेतातून दहा मण सुद्धा भात मिळाला नाही. शेतात पाच ते सात मण भात पडून वाया गेला आहे. भाताचा पेंढाही कुजून जात असल्याने पुढे जनावरांचे खाण्याचे हाल होणार आहेत.

अतिवृष्टीमुळे तयार पिके वाया गेली आहेत. त्यातच लष्करी अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिके त्याला बळी पडली. अनेक शेतांतून जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घालीत उभी पिके आडवी केली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com