गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान खरेदी परवाना रद्द

नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच बारदान्यामध्ये अफरातफर केल्याप्रकरणी दोन सहकारी संस्थांचा धान खरेदी परवाना रद्द करण्यात आला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली.
Paddy purchase licenses of two institutions in Gondia district canceled
Paddy purchase licenses of two institutions in Gondia district canceled

गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच बारदान्यामध्ये अफरातफर केल्याप्रकरणी दोन सहकारी संस्थांचा धान खरेदी परवाना रद्द करण्यात आला. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात हमी भावानुसार शासकीय धान खरेदी केली जाते. मात्र, गेल्या दोन हंगामात काही शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी करणे,  त्याकरिता बनावट सातबाराचा वापर, शासकीय रकमेची अफरातफर, बारदाना हेराफेरी तसेच धान खरेदी संदर्भाने शासनाने ठरवून दिलेल्या इतर नियमांचा भंग अशा बाबींचा त्यामध्ये समावेश होता.

याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात समिती स्थापन केली. समितीने दीड महिन्यांपूर्वी चौकशी करून आपला अहवाल सादर केला. त्यात धान खरेदीतील अनियमिततेवर बोट ठेवण्यात आले. या अहवालाचा आधार घेत यापूर्वी तीन संस्थांचा धान खरेदी परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गोरेगाव येथील नेहरू सहकारी भात गिरणी मर्यादित संस्था आणि पूर्ती शेती उद्योग सामग्री सहकारी संस्था या दोन बड्या संस्थांचा धान खरेदी परवाना रद्द करण्याची कारवाई केली. या दोन्ही संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. परंतु निर्धारित कालावधीत यांच्याकडून कोणते उत्तर सादर करण्यात आले नाही.

वीस संस्थांवर होणार कारवाई धान खरेदीतील अनियमितता याप्रकरणी आत्तापर्यंत ५ संस्थांवर कारवाई करण्यात आली. यापुढील काळात २० सहकारी संस्थांच्या परवाना रद्द केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com