रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्यांसाठी शासकीय भात खरेदी एजंट म्हणून कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघाची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरू
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरू

रत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्यांसाठी शासकीय भात खरेदी एजंट म्हणून कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघाची नियुक्ती करण्यात आली आहे. या भात खरेदी केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच संघाचे अध्यक्ष पद्माकर आरेकर यांच्या उपस्थितीत झाले.

जिल्ह्यात तयार होणारे भातपीक मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करण्यात येते. यासाठी दरवर्षी शासनाकडून दर निश्‍चिती करण्यात येतो. गतवर्षी हा दर १८१५ रुपये होता. जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने १३१० रुपये दर दिला होता.

त्या वेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती. हा भात गोडाउनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती. गतवर्षी १५ हजार १९१ क्विंटल भाताची विक्री केली होती. मार्केटिंग फेडरेशनने क्विंटलला १७५० रुपये दराने याची खरेदी केली होती. गतवर्षी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनसही दिला गेला. मात्र हा बोनस ५० क्विंटलपर्यंतच मर्यादित होता.

थेट बँकेत पैसे जमा होणार

यंदाच्या वर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटलला १८६८ रुपये हमीभाव निश्‍चित करण्यात आला आहे. सातबारा पाहून एकरी ८ ते १० क्विंटल भात खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर भाताची रक्कम मार्केटिंग फेडरेशनमार्फत बँकेत परस्पर जमा होणार आहे. त्यामुळे भात देते वेळेस भातशेतीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक (केवायसी झालेले) आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वच्छ व चांगल्या दर्जाचे भात संघाकडे विक्रीसाठी देऊन शासन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com