भात खरेदी केंद्राकडून ९५० क्विंटल खरेदी 

मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान भात खरेदी-विक्री संघाला आधारभूत दरानुसार भात खरेदीची परवानगी दिली आहे. आजपर्यंत या केंद्रावर तालुक्‍यातील शंभर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
भात खरेदी केंद्राकडून  ९५० क्विंटल खरेदी  From Paddy Shopping Center Purchase of 950 quintals
भात खरेदी केंद्राकडून  ९५० क्विंटल खरेदी  From Paddy Shopping Center Purchase of 950 quintals

आजरा, जि कोल्हापूर : मार्केटिंग फेडरेशनने आजरा तालुका किसान भात खरेदी-विक्री संघाला आधारभूत दरानुसार भात खरेदीची परवानगी दिली आहे. आजपर्यंत या केंद्रावर तालुक्‍यातील शंभर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांकडून ९५० क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. अजूनही ३० ते ३५ शेतकरी संपर्कात असल्याचे केंद्र चालक रोहित नार्वेकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात पणन विभागाकडून आजरा, अडकूर, तुर्केवाडी, राधानगरी, गोकुळ शिरगाव आणि मलकापूर या ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर शेतकऱ्यांना भात विक्री करता येणार आहे.

प्रतिक्विंटल १ हजार ८६८ रुपये दर अशी आधारभूत किंमत शेतकऱ्यांना दिली जात आहे. यासह ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्यात येणार आहे; मात्र हा बोनस ५० क्विंटलपर्यंत दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. आजरा तालुक्‍यात भात खरेदी केंद्राला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत शंभर शेतकऱ्यांनी या केंद्राकडे नोंद केली आहे. आजअखेर ९५० क्विंटल भाताची खरेदी केली आहे. ही सर्व केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले आहे. 

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आजऱ्यातील केंद्राला भेट देऊन खरेदीबाबत माहिती घेतली होती. या वेळी त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यांच्या हस्ते भात पोत्यांचे पूजनही झाले.

त्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कार्यालयातील उपसंचालक भाग्यश्री पोवार, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम, तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन, नामदेव नार्वेकर, महादेव पोवार उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com