agriculture news in marathi paddy transplanting at low cost by machine is possible | Agrowon

यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्य

वाय. आर. महल्ले, डॉ. एन. एस. वझिरे
शुक्रवार, 3 जुलै 2020

भाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक, पुनर्लागवड (रोवणी) करणे या सर्व कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.सध्या मजुरांच्या वेळेवर उपलब्धतेची मोठी अडचण भासते. परिणामी रोवणीला उशीर होतो. यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पेरीव धान पद्धतीचा अवलंब करू शकतो.

भाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक, पुनर्लागवड (रोवणी) करणे या सर्व कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.सध्या मजुरांच्या वेळेवर उपलब्धतेची मोठी अडचण भासते. परिणामी रोवणीला उशीर होतो. यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पेरीव धान पद्धतीचा अवलंब करू शकतो.

पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यातील काही भागात पर्जन्यमानाची सरासरी १२०० ते १७०० मिमी आहे. या अति पर्जन्यमानाच्या प्रदेशात भात (धान) खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यातही भंडारा जिल्ह्यामधील भाताखालील क्षेत्र १,७५,४०३ हेक्टर असून, त्यातील सुमारे ९०ते ९५ टक्के क्षेत्रामध्ये पुनर्लागवड (रोवणी) पद्धतीने लागवड केली जाते. उर्वरित ५ ते १० टक्के क्षेत्र हे पेरणी (आवत्या) पद्धतीने केले जाते. या आवत्या पद्धतीतून ३ ते ६ टक्के क्षेत्र हे फोकून तर २ ते ४ टक्के क्षेत्र हे पेरीव पद्धतीखाली आहे.

रोवणी पद्धतीमध्ये चिखलणी व रोवणी या मुख्य कामांसाठी एकूण भात उत्पादन खर्चाच्या २५ ते ३५ टक्के खर्च होतो. भाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक, पुनर्लागवड (रोवणी) करणे या सर्व कामांसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते.सध्या मजुरांच्या वेळेवर उपलब्धतेची मोठी अडचण भासते. परिणामी रोवणीला उशीर होतो. यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पेरीव धान पद्धतीचा अवलंब करू शकतो.

पेरणी योग्य पाऊस (साधारणतः ८० ते १०० मिमी) झाल्यानंतर दोन उभ्या आडव्या नांगरणी केल्यानंतर वापसा स्थितीत पेरणी करावी. त्यासाठी खालील यंत्रे उपयोगी ठरू शकतात.

तिफण किंवा पेरणी यंत्र
नांगर व तिफणीद्वारे किंवा पेरणी यंत्राने ओळीत धान पेरणी करता येते. त्यासाठी हेक्टरी ७५-८० किलो बियाणे पुरेसे होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार आंतरमशागत करावी. यात दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवावे. पेरणी २-४ सेंमी खोलीवर करावी.

राईस ग्रेन प्लँटर
भात पेरणीकरिता लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला ११ दाते आहेत. दोन ओळीतील अंतर २५ ते ३० सेंमी तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ सेंमी ठेवता येते. भाताची पेरणी २ ते ४ सेंमी खोलीवर करता येते. याची रचना पेरणी यंत्रासारखी असून, पेरणीसोबत खत देण्याचीही व्यवस्था आहे. यामुळे चिखलणी करणे, रोपवाटिका लावणे, रोपांची वाहतूक, रोवणी इ. वेळखाऊ कामे करण्याची आवश्यकता राहत नाही. परिणामी खर्चात बचत होते. एक ते दीड तासात एक एकर पेरणी शक्य होते.

पेरीव धान पद्धतीत पेरणी करताना घ्यावयाची काळजी

  • पेरणी योग्य पाऊस ( साधारणतः ८० ते १०० मिमी) झाल्यानंतर वापसा परिस्थितीत यंत्राचा वापर करून पेरणी करावी.
  • पेरणी २ ते ४ सेंमी खोलीपर्यंत करावी.
  • पेरणीनंतर ४८ तासाच्या आत व जमिनीत ओलावा असताना तणनाशकाचा वापर करावा.

ड्रम सीडर
आपत्कालीन पीक नियोजनात पेरणीसाठी याचा वापर करू शकतो. भात संशोधन संचालनालय, हैदराबाद यांनी विकसित केलेल्या या ड्रम सीडरद्वारे मोड आलेले बियाणे पेरता येते. त्याद्वारे दोन ओळीतील अंतर २० सेंमी तसेच दोन रोपातील अंतर ५-७ सेंमी ठेवले जाते. चिखलणी केलेल्या समांतर शेतात पेरता येते. या पद्धतीत मजुरांवरील खर्च कमी होतो. मात्र, या पद्धतीत भात पीक लागवडीस काही मर्यादा आहेत.

  • जमीन चिखलणीसाठी आवश्यक पावसाची गरज असते. सपाट चिखलावर पेरणी करावी लागते.
  • पेरणी करताना बांधीमध्ये चिखलावर पाणी भरलेले असू नये.
  • पेरणीनंतर एक आठवडा २ -३ सेंमी पाणी बांधीत असणे आवश्यक आहे.
  • भात बांधितील तण नियंत्रण वरचेवर करणे आवश्यक आहे. कधी कधी पक्ष्यांचा त्रास संभवतो.

सध्याच्या परिस्थितीत एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर मिळणे शक्य होत नाही. मजुरांअभावी रोवणी लांबत जाते. हे टाळण्यासाठी भात पेरणी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होऊन अपेक्षित उत्पादन मिळते.

संपर्क- वाय. आर. महल्ले, ८००७७७५६१३
(विषय विशेषज्ञ - कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा.)


इतर टेक्नोवन
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...