agriculture news in marathi, paddy variety developed for poha, ratnagiri, maharashtra | Agrowon

खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’ जात विकसित
राजेश कळंबटे
रविवार, 16 जून 2019

रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कर्जत शताब्दी ही भाताची नवी जात विकसित केली आहे. या जातीला विशिष्ट सुवास असल्याने पोहा निर्मितीसाठी ही जात फायदेशीर ठरणार आहे. बोटवेल या स्थानिक जातीपासून म्युटेशन ब्रीडिंग तंत्राने कर्जत शताब्दी ही जात विकसित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनी दिली.

रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कर्जत शताब्दी ही भाताची नवी जात विकसित केली आहे. या जातीला विशिष्ट सुवास असल्याने पोहा निर्मितीसाठी ही जात फायदेशीर ठरणार आहे. बोटवेल या स्थानिक जातीपासून म्युटेशन ब्रीडिंग तंत्राने कर्जत शताब्दी ही जात विकसित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनी दिली.

विद्यापीठाच्या कर्जत संशोधन केंद्राचे यंदाचे वर्ष हे शताब्दी वर्षे आहे. या केंद्रातून सुमारे चाळीसपेक्षा अधिक भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या केंद्राच्या शताब्दी वर्षानिमित्त भाताच्या नवीन जातीला कर्जत शताब्दी असे नाव देण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या जॉइंट ॲग्रेस्कोमध्ये या जातीला प्रसारासाठी मान्यता देण्यात आली. या बैठकीला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे तसेच संशोधन केंद्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. 

कर्जत संशोधन केंद्रावर बियाणे उपलब्ध 
कर्जत, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, फोंडाघाट येथील संशोधन प्रक्षेत्रांच्या बरोबरीने शेतकऱ्यांच्या शेतावर या जातीची लागवड करून उत्पादनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर ही जात लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आली. कर्जत (जि. रायगड) येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रामध्ये कर्जत शताब्दीचे बियाणे उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्याशी ८८७९०३४३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.]

कर्जत शताब्दीची वैशिष्ट्ये

  • मध्यम कालावधीची जात (१२५ ते १३० दिवस)
  • आखूड-जाड दाणा, पीक लोळत नाही.
  • विशिष्ट सुवास. 
  • पोह्यांसाठी उपयुक्त, मोदक निर्मितीसाठी पीठ उत्तम. हेक्टरी चार टन उत्पादन.

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...