agriculture news in Marathi, Padurang watharkar says, guava and drumstick has market , Maharashtra | Agrowon

औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा शेतीला भविष्यः पांडुरंग वाठारकर
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके आहेत. पण त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, भविष्यात या पिकांना मोठी मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, चांगले पैसे मिळवून देणारी पर्यायी पिके म्हणून या पिकांचा विचार करता येईल,’’ असे माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी शनिवारी (ता.१४) येथे सांगितले. 

सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके आहेत. पण त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, भविष्यात या पिकांना मोठी मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, चांगले पैसे मिळवून देणारी पर्यायी पिके म्हणून या पिकांचा विचार करता येईल,’’ असे माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी शनिवारी (ता.१४) येथे सांगितले. 

अखिल महाराष्ट्र पेरू व शेवगा उत्पादक व संशोधन महासंघाच्या वतीने सोलापुरात शनिवारी पहिल्यांदाच पेरू व शेवग्याची परिषद पार पडली. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वाठारकर बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पेरू व शेवगा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य सुहास पाटील, ज्येष्ठ नेत्या पद्मजादेवी मोहिते पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे, किरण जाधव, उद्योग भारतीचे महेश कडूस पाटील, माढा पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज सावंत, राजाराम येवले आदी उपस्थित होते.

श्री. वाठारकर म्हणाले, ‘‘सोलापूरप्रमाणेच अन्य दुष्काळी भागात पेरू व शेवगा फायदेशीर ठरतील. पेरूचे आणि शेवग्याचे औषधी गुणधर्म चांगले आहेत. पाण्याचा फारसा ताण नाही, कमी कीडरोग यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे आहे. आज सरकारची धोरणेही बदलत आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांनी पुढे येण्यापेक्षा सामूहिक पद्धतीने गटशेती, शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून या पिकांकडे वळले पाहिजे. इस्त्राईलसारख्या देशात ज्या पद्धतीने समूहशेतीद्वारे शेती होते. तशीच शेती आपल्याकडे होण्याची गरज आहे. तरच या पिकांना राजाश्रय मिळेल.’’ शेतकऱ्यांनी ठरवले तर काहीही अशक्‍य नाही, अनेक धडपडी शेतकरी सोलापुरात घडले आहेत.

रमेश घोलपसारखा जिल्हाधिकारीही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनच पुढे आला, कामात जिद्द, ध्येय ठेवा, कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, असेही ते म्हणाले. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनीही शासनाकडून फळबाग योजनेसाठी पुरेसा निधी दिला जातो आहे. पेरू, शेवग्याकडे वळा, तसेच त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या, ग्राहक आपल्याकडे आपोआप येईल, असे सांगितले. पद्मजादेवी मोहिते पाटील यांनीही शेतीची बदलती परिस्थिती आणि त्यात पेरू, शेवग्याचे महत्त्व कसे आहे, हे पटवून दिले. कडूस पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पेरू व शेवगा संघाच्या स्थापनेमागची भूमिका सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती मोहोळकर यांनी केले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परिषदेच्या मुख्य उदघाटन समारंभानंतर पेरू व शेवगा उत्पादकांसाठी खास तांत्रिक चर्चासत्रे झाली. त्यात कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मनोज माळी यांनी पेरू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान व मार्केटिंग या विषयावर तर सोलापुरातील कोरडवाहू कृषी संशोधन केंद्रातील डॉ. मंजुनाथ पाटील यांनी शेवगा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एल. आर. तांबडे यांनीही पेरू व शेवगा पिकातील वाण, लागवड व्यवस्थापन, मार्केटिंग या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...